Samruddhi Mahamarg Toll: समृद्धी महामार्गावर 'टोल'धाड, ट्रकसाठी १००० तर कारसाठी २०० रुपये वाढ; नवे दर काय?

Samruddhi Mahamarg Toll Price Hike: समृद्धी महामार्गावर आजपासून टोलदरामध्ये वाढ झाली आहे. २०० रुपयांपासून ते १००० रुपयांवर टोलदरात वाढ झाली आहे. कोणत्या वाहनांसाठी किती टोल भरावा लागेल हे घ्या जाणून...

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावरील प्रवास १ एप्रिल म्हणजे आजपासून महागला आहे. समृद्धी महामार्गावरील टोल दरात वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांना आता टोलसाठी १९ टक्क्यांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ३१ मार्च २०२८ पर्यंत हे नवे टोल दर लागू करण्यात आले आहेत.

समृद्धी महामार्गावरील टोलदरामध्ये २०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी १२९० रुपये टोल भरावा लागणार आहे. पुढच्या ३ वर्षांसाठी हे टोलदर लागू असतील. या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किती टोल भरावा लागणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत....

समृद्धी महामार्गावरील नवे टोलदर किती? -

कार - आधी टोलसाठी १०८० रुपये द्यावे लागत होते. आता १२९० रुपये टोल द्यावा लागेल.

मिनी बस - आधी टोलसाठी १७४५ रुपये द्यावे लागत होते. आता २०७५ रुपये टोल भरावा लागेल.

बस आणि ट्रक - आधी ३६५५ रूपये टोल भरावा लागत होता. आता ४३५५ रुपये टोल भरावा लागेल.

अवजड वाहनं - आधी ५७४० रुपये टोल भरावा लागत होता. आता ६८३० रुपये टोल भरावा लागेल.

अति अवजड वाहनं - आधी ६९८० रुपये टोल भरावा लागत होता. आता यासाठी ८३१५ रुपये टोल भरावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com