Buldhana Bus Accident News : बसच्या खिडकीची काच फोडून बाहेर पडलेल्या तरुणानं सांगितला तो भयावह प्रसंग

Samrudhhi Mahamarg Bus Accident Update : बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघातानंतर बस जळून खाक झाली.
Samrudhhi Mahamarg Bus Accident survivor
Samrudhhi Mahamarg Bus Accident survivorSAAM TV
Published On: 

Samrudhhi Mahamarg Bus Accident Update : बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघातानंतर बस जळून खाक झाली. या अपघातात २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ७ प्रवासी बचावले आहेत. खिडकीची काच फोडून सुखरूप बाहेर पडलेल्या एका तरूणानं हा भयावह प्रसंग सांगितला.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या अपघातांमध्ये शेकडोंचा बळी गेला आहे. या महामार्गावर आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात (Accident) शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास झाला. विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूरहून पुण्याकडे येत होती. ही बस सिंदखेडराजा परिसरात दुभाजकाला धडकून उलटली. त्यानंतर आग लागली. यात २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर ७ प्रवासी बचावले आहेत.

Samrudhhi Mahamarg Bus Accident survivor
Samruddhi Mahamarg Bus Accident: समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
Samrudhhi Mahamarg Bus Accident survivor
Buldhana Bus Accident: बसचा फक्त सांगाड उरला; प्रवाशांचा झाला कोळसा.. मृतांची ओळख पटवणार कशी? पोलिसांसमोर 'हा' एकच पर्याय

तरूणानं सांगितली आपबीती

या अपघातातून बचावलेल्या तरूणाच्या माहितीनुसार, साधारण मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांनी हा अपघात झाला. बस (Bus Accident) आधी दुभाजकाला धडकली. त्यानंतर रस्त्यावर उलटली. काही क्षणांतच या बसने पेट घेतला. अख्खी बस पेटली. एका प्रवाशानं खिडकीची काच फोडली आणि तो बाहेर पडला. त्यापाठोपाठ आम्ही तिघे-चौघे बाहेर पडलो. बाकीचे सर्व आतमध्येच होते. एक ड्रायव्हर आणि क्लीनर बचावला. अपघातातून बचावलेला हा तरूण औरंगाबादचा आहे. तो नागपूरहून औरंगाबादला येत होता. (Samrudhhi Mahamarg Bus Accident)

Samrudhhi Mahamarg Bus Accident survivor
Samruddhi Highway Bus Accident: बेताच्या परिस्थितीत नोकरी मिळवली, जॉईन होण्यासाठी पुण्याला निघाला; पण वाटेतच...
Samrudhhi Mahamarg Bus Accident survivor
Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेनंतर अजित पवार भावविवश, आतातरी...

ड्रायव्हरनं सांगितलं अपघाताचं कारण

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातून बसचा चालक आणि क्लीनर बचावला आहे. तर दुसऱ्या चालकाचा मृत्यू झाला आहे. बचावलेल्या चालकाच्या दाव्यानुसार, बसचा टायर फुटल्यानंतर दुभाजकाला धडकून ती उलटली आणि पेट घेतला. मात्र, आता टायर फुटून अपघात झाला नाही, असा प्राथमिक अहवाल आरटीओकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता अपघात नेमका कसा झाला, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com