Buldhana Bus Accident: बसचा फक्त सांगाड उरला; प्रवाशांचा झाला कोळसा.. मृतांची ओळख पटवणार कशी? पोलिसांसमोर 'हा' एकच पर्याय

Buldhana Bus Accident Update: हा अपघात इतका भीषण होता की बसचा फक्त सांगाडा उरला असून प्रवाशांचा जळून कोळसा झाला
Buldhana Bus Accident
Buldhana Bus Accident Saamtv
Published On: 

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. आज पहाटेच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने बसला भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

हा अपघात इतका भीषण होता की बसचा फक्त सांगाडा उरला असून प्रवाशांचा जळून कोळसा झाला. त्यामुळे आता अपघातात मृत्यू झालेल्या मृतांची ओळख पटवणार कशी याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Buldhana Bus Accident
Nagpur Pune Bus Accident: समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

कसा झाला अपघात...

विदर्भ टॅव्हल्सची (Vidharbh Bus Accident) ही खासगी बस काल संध्याकाळी 5 वाजता नागपूरहून पुण्याकडे (Pune) निघाली होती. या बसमध्ये दोन चालक होते. साधारणतः मध्यरात्री 1.30 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ बसचा भयंकर अपघात झाला. बस आधी एका खांबाला जावून आदळली आणि त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. ज्यानंतर डीझेल टाकी फुटल्याने बसने पेट घेतला.

आगीने बघात बघता रौद्ररूप धारण केलं. त्यामुळे बसमधील 26 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. या बसचा एक चालक दगावला आहे. तर दुसरा चालक शेख दानिश शेख इस्माईल हा बचावला आहे. (Buldhana Bus Accident)

Buldhana Bus Accident
DA Hike Updates: शिंदे सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात केली घसघशीत वाढ

DNA चाचणी होणार..

या अपघातात (Accident) २६ जण जळून खाक झाल्याने मृतदेहांची ओळख पटवणार कशी? याचेच मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. कारण अपघातातील सर्व मृतदेह जळून छिन्नविछिन्न झाले आहेत. त्यांच्या अंगावरील कपडे, सामान जळून खाक झाले आहेत.

त्यात ट्रॅव्हल्स कंपनीकडे या प्रवाशांचे पत्तेही नाहीत. काहींचे फोन नंबर्सही नाहीत. तर काहींचे नावं अर्धवट असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान आता डीएनए चाचणी करूनच मृतांची ओळख पटवली जाणार आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनीही तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com