DA Hike Updates: शिंदे सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात केली घसघशीत वाढ

State Government Employees DA Hike: राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
State Government Employees DA Hike
State Government Employees DA HikeSaam TV
Published On: 

State Government Employees DA Hike: राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे.

State Government Employees DA Hike
Samruddhi Mahamarg Bus Accident: समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

राज्य सरकारी अधिकारी (Government Employees) व कर्मचाऱ्यांना सध्या ३८ टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने महागाई भत्ता ४२ टक्के इतका झाला आहे. विशेष बाब म्हणजे, १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्यात आली असून, पाच महिन्यांच्या थकबाकीसह जूनच्या वेतनापासून देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांची थकबाकीही रोखीने देण्यात येणार आहे. वित्त विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शुक्रवारी (DA Latest News Today 2023) प्रसृत केला. राज्यातील १७ लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

State Government Employees DA Hike
Nashik Accident News: वणी-सापुतारा महामार्गावर भयानक अपघात; ४ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

दरम्यान, केंद्र सरकारने ३ एप्रिल २०२३ त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ केली होती. डीए आणि डीआरएमध्ये (da latest news today) ही वाढ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के झाला आहे.

आता केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय काढल्याने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com