Samruddhi Expressway Accident News : समृद्धी महामार्गावर मासे घेऊन जाणारा ट्रक उलटला; अपघातस्थळी माश्यांचा खच

समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात चिंतेचा विषय बनला आहे
Bhandara Accident News
Bhandara Accident Newssaam tv

Samruddhi mahamarg News : समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात चिंतेचा विषय बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या महामार्गावर भीषण अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आज, शुक्रवारी देखील भरधाव ट्रकला अपघात झाला. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

बुलढाण्यातून (Buldhana) जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पश्चिम बंगालकडे मासे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातात (Accident) ट्रक समृद्धी महामार्गावर उलटला आहे. या अपघातानंतर महामार्गावर माश्यांचा खच आहे.

Bhandara Accident News
Rahul Gandhi Tweet: खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

अपघात झाल्यानंतर मासे जमा करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. तर अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

टेम्पोची दुचाकीला धडक, दोन युवक गंभीर जखमी

दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावरील लोटे येथे एका टेम्पोची दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन युवक गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला. आज पासून मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे.

Bhandara Accident News
Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गानजीक बस- ट्रकचा अपघात; १५ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

नमाज देऊन दुचाकीवरून घरी परतत असलेल्या दोन युवकांना मुंबईच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. जखमी युवकांना लवेल येथील घरडा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com