Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये शेततळ्यात सापडला ६ वर्षीय मुलीचा मृतदेह, नेमकं काय घडलं?

Sambhajingar News : संभाजीनगरमध्ये पळशी शिवारात शेततळ्यात पडून सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
TRAGIC DEATH OF 6 YEAR OLD GIRL IN FARM POND IN SAMBHAJINAGAR
TRAGIC DEATH OF 6 YEAR OLD GIRL IN FARM POND IN SAMBHAJINAGARSaam Tv
Published On
Summary
  • पळशी शिवारात सहा वर्षांच्या मुलीचा शेततळ्यात पडून मृत्यू

  • खेळताना तोल जाऊन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती

  • पोलिसांकडून तपास सुरू; कुटुंबावर शोककळा

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळशी शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेततळ्यात पडून अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव तनुजा रवी राठोड असे असून तिचे वय अवघे सहा वर्षे होते. ती आपल्या कुटुंबासोबत पळशी शिवारात राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, खेळता खेळता तिचा तोल जाऊन ती शेततळ्यात पडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

TRAGIC DEATH OF 6 YEAR OLD GIRL IN FARM POND IN SAMBHAJINAGAR
Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

तनुजाला शेततळ्यात पडल्याचे पाहून पळशी शिवारात राहणारे ज्ञानेश्वर पळसकर यांनी अग्निशमन दलाला फोन करून शेतातील तळ्यात एक लहान मुलगी पडल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने काही वेळातच मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, मुलीला बाहेर काढल्यानंतर तिची कोणतीही हालचाल जाणवत नव्हती.

TRAGIC DEATH OF 6 YEAR OLD GIRL IN FARM POND IN SAMBHAJINAGAR
Shocking : भरमंडपात रक्ताचा सडा, मेहुणीच्या लग्नात भाऊजीची हत्या, साडूनेच केला घात

तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेने उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मात्र, नेमकी घटना कशी घडली याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी शेततळ्यांभोवती सुरक्षेची उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com