Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्स बसची कंटेनरला धडक; एकाचा जागीच मृत्यू

Sambhajinagar Samruddhi Expressway Accident News : समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळ ट्रॅव्हल्स बसने कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Samruddhi Expressway Bus Accident News
Samruddhi Expressway Bus Accident News Saam Tv
Published On
Summary
  • समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळ ट्रॅव्हल्स बस आणि कंटेनर ट्रकचा भीषण अपघात

  • बसने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान

  • दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू

  • ट्रॅव्हल्स बसमधील १० प्रवासी गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने पुढे जात असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, ट्रॅव्हल्समधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हल्स बस छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होती. वैजापूर परिसरात आल्यानंतर बसने पुढे चाललेल्या कंटेनर ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

Samruddhi Expressway Bus Accident News
Amla Benefits : केसांपासून ते पचनापर्यंत होतील 'हे' ६ फायदे, आवळ्याचा ज्यूस १५ दिवस रोज पिऊन पाहा

या दुर्घटनेत हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय ६५, रा. वैजापूर) यांचा मृत्यू झाला. तर बसमधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Samruddhi Expressway Bus Accident News
Karlyacha Juice : डायबिटीजला आता बोला बाय बाय! कारल्याचा ज्यूस दररोज प्यायल्याने 'हे' ६ आजार पळतील दूर

अपघातानंतर समृद्धी महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दुर्घटनाग्रस्त वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बसचा वेग अधिक असल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असून, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे पुन्हा एकदा भरधाव वेग, चालकांचे नियंत्रण आणि महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com