- Ramu Dhakne
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ((adarsh nagari sahakari patsanstha aurangabad) सुमारे 200 कोटींच्या घाेटाळ्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे (ambadas mankape) यांनी आणखी एक घाेटाळा केल्याचे समाेर आले आहे. मानकापे यांनी आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही (adarsh mahila bank nagri sahkari bank aurangabad) उचापती केल्याचे उघडकीस आले आहे. (Maharashtra News)
छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर घाेटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये ठराविक ठेवीदारांना नियमबाह्य कर्जाची खैरात वाटली असे म्हटलं आहे. आदर्श ग्रुप अंतर्गत येणाऱ्या जवळपास १५ संस्थांना ते वाटप केले. याप्रकरणी अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर मानकापे याच्या दाेन सुनांसह चार जणांना पाेलिसांनी अटक देखील केली हाेती. दरम्यान आदर्श पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयाच्या घोटाळ्यानंतर त्या पाठोपाठ आता आदर्श महिला नागरी पतसंस्थेतही घोटाळा झाल्याचे समाेर आले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या घोटाळ्याप्रकरणी संचालक अंबादास मानकापेसह 22 जणांवर गुन्हा नाेंद झाला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. मुख्य सूत्रधार अंबादास मानकापे यांनी आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही विनाकारण बनावट कर्जाची कागदपत्रे तयार करून आपल्या संस्थांना 48 कोटी रुपयांची कर्ज वितरित केल्याची माहिती समोर आली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.