Water Shortage : पाणी टंचाईच्या झळा; चारा टंचाई पेक्षा पाणी टंचाईने पशुपालकांना चिंता

Sambhajinagar News : काही गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून मुक्या जनावरांना चारा असला तरी त्यांना देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे
Water Shortage
Water ShortageSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळ सदृश्य परिस्थिती सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. पाणी टंचाईच्या झळा जाणविण्यास सुरवात झाली असून (Water Crisis) पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पिण्यासाठीच्या (Sambhajinagar) पाण्याचे नियोजन करून ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र प्राण्यांना पाणी कसे द्यायचे याची चिंता पशुपालकांना आतापासून लागली आहे. (Breaking Marathi News)

Water Shortage
Mahavitaran News : २० दिवसांत दीड हजार थकबाकीदारांची तोडली वीज; महावितरणची कारवाई

मराठवाड्यासह संभाजीनगर  जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. काही गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून मुक्या जनावरांना चारा असला तरी त्यांना देखील पिण्याच्या (Water Scarcity) पाण्याची टंचाई भेडसावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे जिथे माणसांना प्यायला पाणी मिळणे मुश्कील आहे. तिथे जनावरांना पिण्यासाठी पाणी कुठून आणणार? अशी चिंता आता पशुपालकांना पडली आहे. अर्थात तीव्र उन्हाळ्यात जनावरांना देखील पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Water Shortage
Lok Sabha Election 2024 : नंदुरबारमधील ९ हजार मतदार घरबसल्या करणार मतदान

पाणवठ्यांची होतेय मागणी 

दरम्यान पाणीपुरवठा विभागाच्या जून अखेरच्या टंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील सुमारे ९०२ गावांना आता पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. यामध्ये जनावरांचे देखील मोठे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात असून जनावरांसाठी पाणवठे निर्माण करण्यात यावे; अशी मागणी शेतकरी (Farmer) वर्गातून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com