Lok Sabha Election 2024 : नंदुरबारमधील ९ हजार मतदार घरबसल्या करणार मतदान

Nandurbar News : मतदान करण्याची इच्छा असतानाही वय, आजार आणि दिव्यांगत्वामुळे मतदान केंद्रापर्यंत जाता येऊ शकत नाही. असे मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतात.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Saam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी प्रशासनाची देखील जोरदार तयारी सुरु असून या (Lok Sabha) लोकसभा निवडणूकीत मत घेण्यासाठी मतदान कर्मचारी आपल्या दारी असणार आहेत. यात नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील जवळपास ९ हजार मतदार हे घरी राहूनच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : महायुतीत ठाणे, रत्नागिरी आणि पालघरचा तिढा सुटला? संभाव्य उमेदवारांची नावे आली समोर

मतदान करण्याची इच्छा असतानाही वय, आजार आणि दिव्यांगत्वामुळे मतदान केंद्रापर्यंत जाता येऊ शकत नाही. असे मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतात. त्यामुळे अशा मतदारांसाठी यंदाच्या (Lok Sabha Election) लोकसभा निवडणुकीत घरी राहून मतदान करण्याची सोय करण्यात येणार आहे. जवळपास नऊ हजार मतदार (Voter) अशाप्रकारे मतदान करू शकतील. अर्थात जिल्हा प्रशासनाकडून त्यासंबधिती माहिती गोळा करत तशी तयारी करण्यात येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lok Sabha Election 2024
Sambhajinagar News : पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा; भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची केली मागणी

पाहणी करून भरला जाणार अर्ज 

संबंधित मतदारांकडून आधी अर्ज भरून घेतला जाणार आहे. खरंच मतदार मतदान केंद्रापर्यंत येऊ शकण्यास असमर्थ आहे का? याची पहाणी केली जाईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. यासाठी मतदान कर्मचाऱ्यांची टीम संबंधित घरी जातील. मतपत्रिका, ठसा, मतपेटी, गोपनीय पद्धतीने मतदान करता येईल; असा आडोसा असलेले साहित्य सोबत राहणार आहे. यामुळे वयोवृद्ध व विकलांग नागरिकांना याच्या फायदा होणार आहे तसेच मतदानाची टक्केवारी देखील वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com