रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : मागील दोन- तीन वर्षांपासून गोव्याची दारू आणून ती संभाजीनगरमध्ये विक्री केली जात (Sambhajinagar) होती. या दारू विक्री करणाऱ्या एकाला (Liquor) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)
कोरोना (Corona) काळात लागलेल्या लॉकडाऊनपासून अवैधरित्या गोव्याची दारू विक्री केली जात होती. दारू विक्री करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भालगाव फाटा येथे पकडले. महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेली (Goa) गोव्याची दारू विक्रीसाठी एक जण कारमधून घेऊन येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला लागली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
४ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त
दरम्यान या कारवाईमध्ये ५४३ विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडून दीड लाखाची विदेशी दारू आणि ३ लाखाची कार असा एकूण ४ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.