Milk Price : दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; अंगावर दूध ओतून केला सरकारचा निषेध

Sambhajinagar News : सरकारने दुधाला २६ रुपये भाव दिला आहे. मात्र, वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत शासनाने दिलेला दर हा कमी आहे.
Milk Price
Milk PriceSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दुसरीकडे मात्र शेतकरी वर्ग कुठल्या ना कुठल्या प्रश्नावरून आक्रमक होताना दिसत आहे. यातच दूध दर कपातीच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव येथे शेतकऱ्यांनी दूध अंगावर ओतून घेत आंदोलन केलं. 

Milk Price
Buldhana News : भुईमूग व कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; अवकाळी आणि सततच्या ढगाळ वातावरणाचा फटका

सरकारने दुधाला २६ रुपये भाव दिला. मात्र, ४० रुपये प्रति लिटर दराने भाव मिळावा; अशी प्रमुख मागणी आता दूध उत्पादक शेतकरी करत आहे. (Sambhajinagar) १ तासापासून हे आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी यामध्ये सहभागी झाले. गेल्या काही दिवसापूर्वी याच ठिकाणी (Milk) दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आपला निषेध व्यक्त केला होता. आज पुन्हा एकदा सकाळी १० वाजता हे शेतकरी एकवटले आणि त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत सरकारचा निषेध नोंदवला.

Milk Price
Hingoli Water Crisis : दुष्काळाची दाहकता वाढली; हिंगोली जिल्ह्यात ५१ तलाव कोरडे ठाक

सरकार विरोधात घोषणाबाजी 

एक ते दीड तास हे आंदोलन सुरू होतं. दरम्यान शेतकऱ्यांचे (farmer) मरण हेच सरकारचे धोरण असेही काही शेतकऱ्यांनी सांगितलय. त्यामुळे सरकारने आता आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर यापेक्षाही आक्रमक (Milk Price) आंदोलन करू असा इशाराही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. तर शेतकऱ्यांनी यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com