Sambhaji Nagar News: गाडी लावायची तर पाणीपुरी फुकट द्यायची; विक्रेत्‍यास केली मारहाण

गाडी लावायची तर पाणीपुरी फुकट द्यायची; विक्रेत्‍यास केली मारहाण
Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar NewsSaam Tv

छत्रपती संभाजीनगर : आम्हाला फुकट पाणीपुरी द्यायची असेल तरच इथे गाडी लावायची. असे म्हणत पाणीपुरी विक्रेत्याला शिवीगाळ करत मारहाण (Crime News) केल्याची घटना उघडकीस आली. (Live Marathi News)

Sambhaji Nagar News
Sharad Pawar: अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा, शरद पवारांच्या आत्मचरित्रात उल्लेख

छत्रपती संभाजीनगर शहरातील शहानुरवाडी भागात पुरणसिंग यादव हे आपली पाणीपुरीची गाडी चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असतात. नेहमी लावत असलेल्‍या जागेवर यादव हे गाडी लावायला आले. परंतु, त्या ठिकाणी काही तरुणांनी येत आम्हाला फुकट पाणीपुरी द्यायची; तरच येथे गाडी लावायची असे म्हणत पुरणसिंग यादव यांना (Aurangabad) शिवीगाळ करून मारहाण केली.

Sambhaji Nagar News
Buldhana News: सततच्या अवकाळीने मोसंबीची बाग उध्वस्त

तीन जणांविरोधात गुन्‍हा दाखल

या प्रकरणी पुरणसिंग यादव यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यद शहजाद सय्यद अल्लू, शेख अन्सार शेख सत्तार, शेख शाहरुख शेख वाहिद अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com