आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलंय. पंढरपूरच्या वारीत सहभागी होतांना धारकऱ्यांना संबोधित करतांना त्यांनी हे विधान केलं. पुण्यात आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत झालं. लाखो वारकरी पंढरीकडे पालखींसोबत निघाले. दरम्यान यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी झालेत. यंदाही ते वारीत सहभागी झालेत.
संभाजी भिडेदेखील वारीत सहभागी होणार आहेत.ते पुण्यात आल्यावर जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात जात दर्शन घेतलं. त्यावेळी धारकऱ्यांना संबोधित करताना महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं असं विधान संभाजी भिडे म्हणालेत. दरम्यान धारकरी दरवर्षी संचेती हॉस्पिटलच्या पुढे पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. त्याठिकाणी नेहमीच पोलीस बंदोबस्त वाढवावा लागतो. दरवर्षीप्रमाणे यंदा ही भिडे सोहळ्यात सहभागी झालेत. मात्र भिडेंच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
पुणे पोलिसांनी संभाजी भिडेंना नोटीस पाठवली होती. पालखीला मानवंदना करताना कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची काळजी घ्या. तेढ निर्माण करणारी भाषणे करू नका, अशा सूचना पुणे पोलिसांनी भिडेंना दिल्यात. दरम्यान संभाजी भिडे यांनी पुण्यात महिलांसंदर्भात वादग्रस्त विधानावर उबाठा शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी आक्षेप घेतलाय. संभाजी भिडे यांनी संपूर्ण देशभरातील महिलांचा पुन्हा एकदा अपमान केला.
महिला आयोग व गृह मंत्र्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण राज्यभर याचे पडसाद उमटणार, असा इशारा शुभांगी पाटील यांनी दिलाय. त्यांनी भिडेंच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतलाय. संभाजी भिडे यांना गुरु मानणारे त्यांचे शिष्य आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे तोडके मोडके कपडे घालून नाचत असतात. त्यांना ज्ञान द्यावे असं उत्तर शुभांगी पाटील यांनी संभाजी भिडेंना दिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.