Saam Survey: मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार भाजपसोबत जातील? सर्वपक्षीय समर्थकांना काय वाटतं?

Sakal-Saam TV Survey : अजित पवार मविआमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करतील, असे वाटते का?' असा प्रश्न विचारण्यात आला.
Sakal-Saam TV Survey
Sakal-Saam TV Surveysaam tv

Sharad Pawar Resigns Sakal-Saam TV Survey : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादीसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. पवारांनी अचानक जाहीर केलेल्या या निर्णयामुले राष्ट्रवादी पक्षात भूकंप आला आहे. यानंतर आता पुढील अध्यक्ष कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील आणि प्रफुल्ल पटेल ही नावं चर्चेत आहे. परंतु सकाळ साम समुहाने केलेल्या सर्व्हेला सुप्रिया सुळे आणि अजित पावारांच्या (Ajit Pawar News) नावाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

Sakal-Saam TV Survey
Saam Survey: शरद पवारांचा उत्तराधिकारी अजित पवार की सुप्रिया सुळे? समर्थकांचा कल समोर

अजित पवार भाजपसोबत जातील का?

'सकाळ-साम टीव्ही'ने केलेल्या सर्व्हेक्षणात 'मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार (Ajit Pawar) मविआमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करतील, असे वाटते का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देतांना ४२.५% लोकांनी अजित पवार भाजपसोबत जाणार नाहीत असे मत व्यक्त केले, तर ३३% लोकांना ते भाजपसोबत जातील असे वाटते. याशिवाय २४.५ % लोक असे देखील आहेत ज्यांना याबद्दल निश्चित सांगता आले नाही.

फक्त राष्ट्रवादीच्या समर्थकांनी या प्रश्नावर काय उत्तर दिलं?

हो - 20.51

नाही - 58.82

सांगता येत नाही - 20.75

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून समर्थकांनी दिलेल्या निष्कर्षानुसार असे दिसून येते की, मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार मविआमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करणार नाहीत.

Sakal-Saam TV Survey
Sakal-Saam TV Survey: शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन भाजपने चूक केली?, सर्व्हेत समर्थकांनी मांडलं धक्कादायक मत

अजित पवार भाजपसोबत गेल्यास राज्याला स्थिर सरकार मिळेल?

याशिवाय 'अजित पवार यांनी भाजप सोबत जावून सरकार स्थापन केले तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल, असे वाटते का?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ५९.६ % लोकांनी नाही असे उत्तर दिले, तर २०% लोकांनी हो असे उत्तर दिले आहे. याशिवाय २०.३% लोकांनी सांगता येत नाही असं असं मत नोंदवलं.

भाजप अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून संधी देईल?

भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास भाजप अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून संधी देईल का? असाही एक प्रश्न या सर्व्हेक्षणात विचारण्यात आला होता. याविषयी २६.५ % लोकांना वाटत की भाजप अशी संधी अजित पवार यांना देईल, तर ४४.७ % लोकांना वाटत भाजप अशी संधी देणार नाही. याशिवाय २८.८% लोक नेमकं सांगू शकले नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com