Maratha Andolan In Kopardi : एक मराठा लाख मराठा...काेपर्डीत ग्रामस्थांच्या उपाेषणास प्रारंभ

गेल्या तीन दिवसांपासून मराठा समाजाच्यावतीने राज्यभरात आंदाेलन छेडले जात आहे.
nagar, maratha andolan
nagar, maratha andolansaam tv

- सुशिल थाेरात

Kopardi Maratha Andolan Latest Updates : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (antarwali sarathi) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) उपोषणास बसलेल्या आंदाेलकांवर केलेल्या लाठीहल्लाचा निषेध नाेंदविण्यासाठी तसेच आंदाेलकांना पाठिंबा देण्यासाठी आज (मंगळवार) नगर जिल्ह्यातील काेपर्डेी येथे ग्रामस्थ उपाेषणास बसले आहेत. (Maharashtra News)

nagar, maratha andolan
Congress Samvad Yatra 2023 : पंतप्रधानपदावरून गडकरी मोदींचे भांडण सुरू : नाना पटाेले

कोपर्डीत सकल मराठा समाजाच्यावतीने भैरवनाथ मंदिर येथे उपोषणास प्रारंभ झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डीतील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी, कर्जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

nagar, maratha andolan
Mla Baban Shinde News : शेतक-यांचे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान हाेणार, आमदार बबन शिंदेंना भीती

या आंदाेलनात शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ माेठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दरम्यान मागण्या मान्य झाल्यास आगामी काळात आंदोलनाचे स्वरुप तीव्र करु असा इशारा देखील आंदाेलकांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com