उद्धव ठाकरेंचा कारभार हा औरंगजेबासारखा - सदाभाऊ खोत

शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Sadabhau Khot and cm Uddhav Thackeray
Sadabhau Khot and cm Uddhav ThackeraySaamTV
Published On: 

लातूर : बीकेसी मैदानात शिवसेनेनं शिवसंपर्क अभियानाची सभा बीकेसी मैदानात घेतली. विरोधकांनी केलेल्या आरोपांना ठाकरी भाषेत उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या या विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करुन विरोधकांचा समाचार घेतला. ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis), किरिट सोमय्या यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर शिवसेनेच्या सभेत सडकून टीका केली होती. सभा संपल्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही पलटवार केला. याच पार्श्वभूमीवर आता शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकरी आणि जनतेचं काही देणं घेणं नाहीय. ठाकरेंच्या कारभार हा औरंगजेबासारखा आहे. औरंगजेबाचे भाषण,वर्तणूक, कायदा आणि उध्दव ठाकरे यांच्या मध्ये काहीच फरक नाही. अशा शब्दांत खोत यांनी ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ते लातूर येथे आयोजित भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

Sadabhau Khot and cm Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा विसर पडला आहे - चंद्रकांत पाटील

यावेळी माध्यमांशी बोलताना खोत म्हणाले, मुख्यमंत्र्यांना शेतकरी आणि जनतेचं काही देणं घेणं नाहीय. ठाकरेंच्या कारभार हा औरंगजेबासारखा आहे.औरंगजेबाचे भाषण,वर्तणूक, कायदा आणि उध्दव ठाकरे यांच्या मध्ये काहीच फरक नाही.जिजिया कर लावून जनतेचे शोषण ज्याप्रमाणे शोषण केले गेले त्याप्रमाणे राज्य कारभार सुरु आहे.मुख्यमंत्री ठाकरे आणि रोमचा राजा रोम जळत असताना बिगुल वाजवत होता. तशी परिस्थिती आज महाराष्ट्राची झाली आहे.

तसंच खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केलीय. शरद पवार यांनी ऊस हे आळशी शेतकऱ्यांच पीक आहे असं विधान केले होते. त्यावर सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलताना म्हणाले, पवार यांचा पुतण्या, मुलगी आणि नातवाने राज्यातील 45 सहकारी साखर कारखाने खाजगी करून का चालवली ? ज्या उसावर राजकारण करत सत्ता मिळवली, मग ऊस आळशी शेतकऱ्यांचं पीक कसं ? त्यांना इतर पीकाकडे का वळवल नाही ? याचं शरद पवार यांनी उत्तर द्यावं.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com