Solapur: वीज कापायला आलात तर शेतकरी दांडक्यानं सोलून काढेल : सदाभाऊ खाेत

सदाभाऊ खाेत हे आज साेलापूर जिल्हा दाै-यावर आले आहेत.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSaam Tv

सोलापुर : राज्यातील शेतकऱ्यांची वीज (electircity) कापायला कोणी येत असेल तर शेतकऱ्यांच्या (farmers) हातामध्ये आता दांडके असतील आणि त्याने सोलून काढलं जाईल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी महावितरणला दिला आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने (mva) आता शेतकऱ्यांना 'वीजबिल माफी'चं द्यावी लागेल अशी अपेक्षा सदाभाऊंनी व्यक्त केली आहे. (sadabhau khot latest marathi news)

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे सोलापुर दाै-यावर आले आहेत. त्यावेळी खाेत यांनी साम टीव्हीशी विविध विषयांवर चर्चा केली. सध्या महाराष्ट्रात (maharashtra) मोठं मोठे नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर इडीच्या छाप्यांचं सत्र सुरू आहे. त्यावर सदाभाऊ म्हणाले येड्यांच्या मागे इडीची चौकशी लागलेली आहे. पण ज्यांच्याकडे शहाणपणा आहे, जे सज्जन आहेत त्यांना येड्यांच्या हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज नाही.

Sadabhau Khot
बलगवडेत रस्त्यावर सापडलेल्या ४ महिन्याच्या बाळावर सांगलीत उपचार सुरु

आयकर विभागास सापडलेल्या डायरीत यशवंत जाधव (yashwant jadhav) यांनी माताेश्रीस गिप्ट दिले आहे. त्यावर ते म्हणताहेत माताेश्री (matoshree) म्हणजे आई. यावर सदाभाऊ खाेत म्हणाले आईला काही उपहार दिलं असेल तर ते आम्ही डायरीत लिहून ठेवत नाही. आईचे अनंत उपकार असतात. त्यामुळे आईला काही दिलं तर ते डायरीत कोणी लिहुन ठेवत नाही. पण आई वसुलदार असेल तर मात्र लिहून ठेवले जाते. नामकरण झालेल्या माताेश्रींवर उपकार केलेले मात्र लिहून ठेवले जाते. आई ही वसुली अधिकारी नसते मात्रं जिथं वसुली होते तिथं मात्र लिहून ठेवले जाते.

Edited By : Siddharth Latkar

Sadabhau Khot
Hottal Mahotsav: नऊ एप्रिलपासून होट्टल महोत्सवाचे आयाेजन : डॉ. विपीन इटनकर
Sadabhau Khot
Maharashtra: 'टोल नाका बंद झाल्यास नितीन गडकरींचा सत्कार अन्यथा तीव्र आंदाेलन'
Sadabhau Khot
ICC Women's World Cup: टीम इंडियाचं स्वप्न भंगलं; No Ball ठरला घातक, WI उपांत्य फेरीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com