गणेशोत्सव भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विघ्नहर्ता, बुद्धी आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गणरायाची या दिवसांत भक्तिभावाने पू्जा केली जाते. यंदा १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थी साजरी केली गेली. घरोघरी गणरायाचे आगमन झाले. घरात, सार्वजनिक मंडळात तसेच अनेक कार्यालयांमध्ये देखील गणपती विराजमान झाले. या दिवसांमध्ये घरगुती गणपतीसोबतच सार्वजनिक मंडळांमध्येही आकर्षक सजावट आणि देखावे पाहायला मिळतात.
मुंबईत 'साम टीव्ही'च्या कार्यालयातही ढोल-ताशांचा गजरात गणपती आले. ११ दिवस सुंदर सजावट, आरती आणि विविध प्रकारच्या नैवेद्याने वातावरण भक्तिमय पाहायला मिळाले. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 'साम टीव्ही'च्या ऑफिसमध्येही पारंपरिक दिवस (Traditional Day) आणि गणपती मूर्ती तयार करण्याची स्पर्धा (Ganesh Murti Making Competition) आयोजित करण्यात आली होती.
गणपती मूर्ती स्पर्धेत कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या हाताने सुंदर मूर्ती साकारली. एकत्र गटात काम करताना खूप मजा आली. रोजच्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ बाजूला काढून 'साम टीव्ही'चे कर्मचारी गणरायाच्या भक्तीत दंग झाले. गणपतीची मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेत विजेत्या टीमसाठी तसेच सहभागी सदस्यांसाठी बक्षीसेही देण्यात आली.
प्रथम पारितोषिक - टीम- A
महेश म्हात्रे
स्वप्नील केमनाईक
दर्शन वैद्य
द्वितीय पारितोषिक - टीम D
मयुरी नार्वेकर
स्वदेश घाणेकर
मानसी खांबे
तन्वी मुद्रा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.