Maharashtra Political News: जामखेड एमआयडीसी प्रकरण तापलं; भरपावसात रोहित पावारांचे आंदोलन सुरुच

औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जाहीर करून या संदर्भातील बाबी पूर्ण करण्याकरिता उद्योग मंत्र्यांनी रोहित पवार यांनी पत्रव्यवहार केला.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSaam TV
Published On: 

Rohit Pawar Protest: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी विधान भवन परिसरात आंदोलन पुकारलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून रोहित पवार आंदोलन करत आहेत. (Latest Marathi News)

कर्जत जामखेड मतदारसंघात पाटेगाव खंडाळा या ठिकाणी औद्योगिकक्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्तावित आहे. या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जाहीर करून या संदर्भातील बाबी पूर्ण करण्याकरिता उद्योग मंत्र्यांना रोहित पवार यांनी पत्रव्यवहार केला. तसेच लवकरच अधिसूचना काढण्याची मागणी केली.

Maharashtra Political News
Rohit Pawar News | "निकाल तुमच्या बाजूनं दिला तर.." भाजपवर रोहित पवार यांची कडाडून टीका

मात्र आता शासन स्तरावर कारवाई होत नसल्याने रोहित पवार विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली आंदोलन करत आहेत. अधिसूचना तातडीने जाहीर व्हावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

गिरीष महाजन आणि चंद्रकांत पाटील देखील रोहित पवारांजवळ पोहचले आहेत. रोहित पवारांची समजूत घालण्याचा ते प्रयत्न करतायत. धोधो पाऊस बरसत असताना देखील भरपावसात रोहित पवारांचे हे आंदोलन सुरुच आहे.

Maharashtra Political News
Ajit Pawar as CM : Anil Patil News : अजितदादा मुख्यमंत्री केव्हा होणार? अनिल पाटीलांनी सांगितलं!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com