सांगलीत १० कोटींचा रस्ते घोटाळा, एकाच रस्त्यासाठी २ योजनेतून लाटले पैसे; नेमकं प्रकरण काय?

Sangli Road Scam : ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच रस्त्याचे २ वेगवेगळ्या योजनांमधून पैसे लाटल्याचं समोर आलंय. हा घोटाळा नेमका कसा केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Road scam of Rs 10 crore in Sangli
Road scam of Rs 10 crore in SangliSaam Tv News
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही

सांगली : देशात रस्त्यांचं जाळं उभारलं जातंय. शहरं आणि गावं रस्त्यांनी जोडले जात आहेत. मात्र, याच रस्त्यांच्या कामांना भ्रष्टाचाराची कीड लागलीय. सांगली जिल्यातील खानापूरच्या खरसुंडी-बलवडी खुर्द, पारे आळते या २६ किलोमीटरच्या एकाच रस्त्यासाठी २ योजनेतून कोट्यावधी रुपये लाटल्याचं समोर आलंय. त्यानंतर आम्ही थेट खरसुंडी-आळते रस्त्यावर पोहोचलो. यावेळी आणखीच धक्कादायक माहिती समोर आली.

एक रस्ता, दोन टेंडर आणि घोटाळा

खरसुंडी-आळते २६ किमी रस्त्याचं रुंदीकरण, खडीकरण आणि डांबरीकरणाचं काम

केंद्राच्या रस्ते निधीतून बांधकाम विभागाकडून काम मंजूर

१७ जानेवारी २०२२

४ कोटी २ लाख ४५ हजार रुपयांच्या कामासाठी कार्यादेश

मेगा ऑटोबन प्रा.लि कंपनीला काम

सरकारकडून कंपनीला ७ टप्प्यात ५ कोटी १९ लाख रुपये जमा

एवढंच नाही तर या घोटाळेबाजांनी आणखी एक नामी युक्ती लढवली, आणि केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या तिजोरीवरही डल्ला मारला.

Road scam of Rs 10 crore in Sangli
Pune Sinhagad News : परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणे पडलं महागात; टवाळखोरांविरोधात पोलिसांत गुन्हा

राज्याच्या बजेटमधून सार्वजनिक बांधकाम विभागाची कामाला मंजूरी

३१ मे २०२२

३ कोटी ९९ लाख ७० हजाराच्या कामासाठी कार्यादेश

मेगा ऑटोबन प्रा. लि कंपनीलाच पुन्हा काम

७ टप्प्यात ठेकेदाराला ४ कोटी ७९ लाख रुपये जमा

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी पवारांच्या राष्ट्रवादीने केलीय. तर दुसरीकडे खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी घोटाळ्याचा आरोप फेटाळून लावलाय. खराब रस्त्यांची कामं करुन पैसे लाटल्याचं अनेकदा समोर आलंय. मात्र आता एकाच रस्त्यासाठी २ योजनांचे पैसे लाटले गेलेत. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने हा घोटाळा सुरु असताना सार्वजनिक बांधकाम विभाग झोपला होता का? रस्त्यांचे ऑडिट झालंय का? आणि झालं नसेल तर या सगळ्या घोटाळ्यात ज्यांचे हात काळे झालेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.

Road scam of Rs 10 crore in Sangli
निलेश घायवळला कानशिलात लगावणारा सागर मोहोळकर कोण? पैलवानाचा हादरवणारा रेकॉर्ड, कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्राचा पक्का खिलाडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com