प्रवाशांसाठी खुशखबर! कोकण अन् सिंधुदुर्गला ८ गाड्यांचा थांबा; कधीपासून होणार सुरूवात?

Major Boost for Sindhudurg, Kankavli: कोकणातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी. आठ मेल-एक्स्प्रेस गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर थांबा मंजूर.
Major Boost for Sindhudurg, Kankavli
Major Boost for Sindhudurg, KankavliSaam
Published On
Summary
  • कोकणातील प्रवाशांसाठी खुशखबर.

  • ८ मेल एक्स्प्रेस गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर थांबा मंजूर.

  • प्रवाशांची मागणी अखेर मान्य.

कोकणातील प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आता आठ मेल एक्स्प्रेस गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. हा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची टप्प्याने अंमलबजावणी २ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, ११ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

अनेक वर्षांनंतर प्रवाशांची मागणी मान्य

या आठ एक्स्प्रेस कोकणातून जात होते. मात्र, या गाड्यांना कणकवली आणि सिंधुदुर्गाचा थांबा नव्हता. या मुख्य स्थानकांवर थांबा नसल्यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय झाली. यासाठी प्रवासी संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी अनेकदा २ स्थानकांवर थांब्याची मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने अखेर मागण्यांना हिरवा कंदील दाखवला.

Major Boost for Sindhudurg, Kankavli
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; २ बड्या नेत्यांकडून रामराम, भाजपचं कमळ हाती घेण्याचं निश्चित

कोणत्या गाड्यांना मिळणार थांबा?

सिंधुदुर्ग स्थानकावर मरूसागर एक्स्प्रेस गाडी क्रमांक १२९७७/७८ आणि एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस या दोन्ही एक्स्प्रेस यांना दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे.

तर, कणकवली स्थानकावर हिसार कोइंबतूर एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडी क्रमांक २२४७५/७६ आणि गांधीधाम - नागरकोईल एक्स्प्रेस गाडी क्रमांक १६३३५/३६ या दोन्ही गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.

Major Boost for Sindhudurg, Kankavli
मुंबईतील कोर्टातच ज्येष्ठ महिला वकिलाचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; पतीचा गंभीर आरोप

कोणत्या गाडीला कधीपासून थांबा मिळणार?

सिंधुदुर्ग स्थानकावर थांबा मिळालेल्या गाड्या

गाडी क्रमांक १२९७६ मरूसागर एक्स्प्रेस - २ नोव्हेंबर

गाडी क्रमांक १२९७८ मरूसागर एक्स्प्रेस - ७ नोव्हेंबर

गाडी क्रमांक २२६५५ एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस - ५ नोव्हेंबर

गाडी क्रमांक २२६५६ हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेस - ७ नोव्हेंबर

कणकवली स्थानकावर थांबा मिळालेल्या एक्स्प्रेस

गाडी क्रमांक २२४७५ हिसार कोइंबतूर एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस - ५ नोव्हेंबर

गाडी क्रमांक २२४७६ कोइंबतूर हिसार एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस - ८ नोव्हेंबर

गाडी क्रमांक १६३३५ गांधीधाम नागरकोविल एक्स्प्रेस - ७ नोव्हेंबर

गाडी क्रमांक १६३३६ नागरकोविल गांधीधाम एक्स्प्रेस - ११ नोव्हेंबर

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग आणि कणकवली परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे कोकण रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com