Maharashtra Police Bharti : पोलीस व्हायचंय ना? 'ते' इंजेक्शन घेण्याचा विचारही करू नका; अन्यथा...

सध्या महाराष्ट्रात सैन्य दलामध्ये आणि पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
Police Bharti
Police Bharti Saam TV
Published On: 

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर - सध्या महाराष्ट्रात सैन्य दलामध्ये आणि पोलीस (Police) दलामध्ये भरती होण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून स्टेरॉईडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर येऊ लागलाय. कोल्हापूर (Kolhapur) पाठोपाठ लातूरमध्येही (Latur) स्टेरॉईडचे इंजेक्शन्स भरतीच्या ठिकाणी सापडल्याने या भरती प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. (Maharashtra Police Bharti)

Police Bharti
Gram Panchayat election: मतदान केंद्र दुसऱ्या गावात; मतदानावर बहिष्कार टाकत गावातच ठिय्या

सैन्य दलात भरती होण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. या भरती प्रक्रियेचा एक टप्पा कोल्हापूर जिल्ह्यात पार पडला. सैन्य दलात भरती होण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून 1 लाखाहून अधिक तरुण मोठ्या उमेदीने या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले होते.

मात्र ही भरती एका वादात सापडली. भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून शिवाजी विद्यापीठ परिसरात चक्क स्टेरॉईडचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. या परिसरात असणाऱ्या स्वच्छतागृहांमध्ये मोठ्या प्रमाणातचे इंजेक्शन्स सापडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दल आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे.

कोल्हापूर पाठोपाठ लातूर मधेही पोलीस भरतीसाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात तरुणांची जोरदार तयारी सुरू आहे. हजारो तरुण यासाठी पहाटेपासूनच व्यायामाचा सराव करताना दिसून येतात. मात्र व्यायामाचा उत्साह येण्यासाठी या तरुणांमध्ये ऊर्जा वाढविणाऱ्या (एनर्जी ड्रिंक) घेण्याचे प्रमाण वाढत असून, त्याचे अनेक दुष्परिणाम कालांतराने भोगावे लागणार आहेत.

Police Bharti
Harshvardhan Jadhav : भाजपच्या बड्या नेत्यांवर बोचरी टीका; कन्नडच्या माजी आमदारांवर पुण्यात गुन्हा दाखल

भरती प्रक्रिये वेळी जरी विद्यार्थ्यांनी स्टेरॉईडचा वापर केला असला तरी भरतीमध्ये मेडिकल टेस्ट केली जाते आणि यामध्ये त्याचा अंश सापडला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचा अवलंब करू नये. निवड चाचणी वेळी मेडिकल टेस्ट मध्ये स्टेरॉईड किंवा इतर घटकांचा अंश सापडला तर भविष्यात विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी परीक्षा देता येणार नाहीत.

विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने तयारी केलेली आहे , त्या तयारीवर विश्वास ठेवून त्यांनी भरती प्रक्रिया पूर्ण करावी त्यातूनच त्यांची निवड होणार आहे. जर स्टेरॉईड सारख्या इंजेक्शनचा वापर करून अग्नीवीर होण्याची किंवा पोलीस भरती होण्याची इच्छा असेल त्यांना मात्र भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.