विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारी यादी जाहीर झाल्या असून त्यांच्या उमेदवारांनी आज अर्ज देखील दाखल केले. उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी केली तर काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. अशातच रत्नागिरीत एकही जागा न मिळाल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. गुहागर मतदारसंघावर भजपने दावा केला होता. मात्र शेवटच्या यादीत देखील भाजपला स्थान मिळाले नाही.
गुहागरमधून विनय नातू भाजपकडून इच्छुक उमेदवार होते. शिवसेनेच्या शेवटच्या यादीमध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपला न सुटल्याने विनय नातू नाराज आहेत. साम टीव्हीशी संवाद साधताना नाराज विनय नातू यांनी सांगितले की, 'भाजपला जिल्ह्यात एकही जागा न मिळाल्याने पुढच्या दृष्टीने खूप कठीण आहे. बाळ मानेंसारखा कार्यकर्ता जाणं म्हणजे खूप मोठे दुःख होतं. आपला जेव्हा आमदार नसतो तेव्हा संकटनात्मक अडचणी या वाढत असतात. मी नाराज असलो तरी महायुतीचे काम करणार आहे.
तसंच,'४० वर्षे काम करणाऱ्या बाळ मनाचा संयम सुटतो तर पुढच्या काळात कार्यकर्त्यांचं काय होईल हे सांगता येत नाही. जागा वाटपाचा फॉर्मुला जिल्ह्यात सोयीस्करित्या बनवला जातो. महाराष्ट्रासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला वेगळा असतो. या जागा वाटपाचा रत्नागिरी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे.', असे मत विनय नातू यांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.