रत्नागिरी : शिवसेना आणि स्थानिकांच्या विरोधामुळे येथील बहुचर्चित रत्नागिरी अणुउर्जा प्रकल्पातील कामगारांसाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना (मनसे कामगार सेना) maharashtra navnirman sena धावून आली आहे.
अणुउर्जा प्रकल्पाच्या सुरवातीच्या काळात होणारा विरोध आजही कायम आहे. अशा वेळी या प्रकल्पाच्या सुरु झालेल्या बांधकामाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुरक्षा रक्षक भरतीसाठी मनसेच्या वतीने सहाकार्याची भुमिका देण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षा रक्षक म्हणुन उमेदवाऱांच्या नेमणुका झाल्या होत्या.
अणुउर्जा प्रकल्पाचे काम सुरु होण्याच्या दृष्टीने हालचालीला वेग आला आहे. दरम्यान पुर्वी नेमलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांना कमी करण्यात आले. कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता मनसे कामगार सेना धावून आली आहे. रत्नागिरीतल्या अणुउर्जा कार्यालयाबाहेर मनसेने कामगार सेना स्थापन करून कमी केलेल्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीची भुमिका घेतली आहे.
मनसेनी अणुउर्जा कार्यालया बाहेर जोरदार शक्ती प्रदर्शन करत मनसे कामगार सेनेची घोषणा केली. यावेळी अरविंद मालाडकर (सुरक्षा रक्षक जिल्हा चिटणीस), अनिरुद्ध खामकर (मनसे कामगार सेना चिटणीस) यांच्यासह मनसैनिक उपस्थित हाेते. त्यामुळे अणुउर्जा कार्यालयात काम करणाऱ्या स्थानिकाच्या मागे मनसे उभी रहाणार आहे हे स्पष्ट झाले आहे. आता पुन्हा एकदा अणु उर्जा प्रकल्पात स्थानिकांचा प्रश्न पेटणार आहे.
या प्रकल्पातील २३ सुरक्षा रक्षकांना कमी करण्यात आले आहे. आज दहा महिने हे कामगार घरी बसून आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांना पुन्हा सामावून न घेतल्यास खळखट्याकने उत्तर दिलं जाईल असा इशारा मनसेने दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.