Rajan Salvi News: चौकशीच्या षडयंत्रामागे सरकारचा हात; एसीबीच्या चौकशीनंतर राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया

Rajan Salvi Latest News: साळवी यांनी एसीबी अधिकाऱ्यांना बँकेतील लॉकर दाखवले. त्यानंतर आमदार राजन साळवी यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. चौकशीच्या षडयंत्रामागे सरकारचा हात,असा गंभीर आरोप यावेळी साळवी यांनी केला.
Rajan Salvi News
Rajan Salvi NewsSaam tv

Rajan Salvi News:

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने छापा टाकला. कथित बेकायदा संपत्ती प्रकरणी एसीबी अधिकाऱ्यांनी साळवींच्या घरी छापा टाकला. गेल्या नऊ तासांपासून राजन साळवी यांच्या घरी एसीबीने कसून चौकशी केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांच्या एफआयआरमध्ये राजन साळवी यांच्यासहित त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावाचाही सामावेश आहे. आज सकाळी छापेमारी झाल्यानंतर साळवी यांनी एसीबी अधिकाऱ्यांना बँकेतील लॉकर दाखवले. त्यानंतर आमदार राजन साळवी यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. चौकशीच्या षडयंत्रामागे सरकारचा हात आहे,असा गंभीर आरोप यावेळी साळवी यांनी केला. (Latest Marathi News)

राजन साळवी काय म्हणाले?

आमदार राजन साळवी म्हणाले, 'मला टिव्ही आणि माध्यमातून वाचनातून समोर आलं की, माझ्याकडे तीन कोटींची संपत्ती असल्याने माझ्यावर गु्न्हा दाखल झाला आहे, असं वृत्त मी पाहिले. त्यामुळे जनतेला सांगू इच्छितो की, मी १०८२ ते १९९२ साली मी सरकारी नोकरी केली. मला पगार मिळत होता. नोकरी सोडल्यानंतर मी रत्नागिरीत झेरॉक्सचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर रत्नागिरीत हॉटेल सुरु केलं. त्याचं परमिट माझ्याकडे आहे.

'मध्यंतरी मी आंब्याचा व्यवसाय करत होतो. २००९ पासून आतापर्यंत मी आमदार आहे. इतक्या संपूर्ण कालावधीत मला चांगले पैसे मिळत होते. या कालावधीत सरकारचाही कर भरला आहे. माझ्यावरील आरोप चुकीचा आहे. राजन साळवीविषयी सर्वांना माहीत आहे', असे साळवी म्हणाले.

Rajan Salvi News
Maratha Reservation Update: शिष्टमंडळासोबतची चर्चा फिस्कटली, जरांगे कोणत्याही परिस्थिती मुंबईत येण्यावर ठाम

एसीबी चौकशीमागे कोणाचा हात? राजन साळवी म्हणाले...

'त्यांना मला आरोपी करायचं आहे. त्यांना माझ्यावर गु्न्हा दाखल करायचा आहे. माझा कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. कार्यकर्त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. मी चुकीचं करू शकत नाही, हे त्यांना ठाऊक आहे. घर आणि हॉटेल बांधलं, त्याचं कर्जही माझ्यावर आहे. माझ्या राहत्या घरी सोने, पैसे सापडले तर मी सामोरे जायला तयार आहे, असे ते म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajan Salvi News
Anganwadi News: अंगणवाडी सेविकांना न्याय मिळणार का? वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

' या षडयंत्रामागे मुख्यमंत्री आहे. आता यांनी ठरवलं आहे की, उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांना त्रास द्यायचा. रविंद्र वायकर यांची ईडीची चौकशी, सूरज चव्हाण यांची चौकशी, वैभव नाईकांची चौकशी केली. राजन साळवी शिंदे गटात येत नसल्याने ही कारवाई आहे. परंतु या कारवाईला आम्ही भीक घालत नाही. मी लोकप्रतिनिधी आहे. मला अटक करा, तुरुंगात टाका. माझी तयारी आहे. पण माझ्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करणे हे १०० टक्के चुकीचं आहे, असंही ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com