Ratnagiri crime News
Ratnagiri crime News Saam Tv

Ratnagiri : प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने जीवनयात्रा संपवली; चिपळूण तालुक्यातील धक्कादायक घटना

प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Published on

जितेश कोळी

Ratnagiri Crime News : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून धक्कादायक घटना घडली आहे. चिपळूण तालुक्यातील अलोरे चेंबरी याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या पती-पत्नीने राहत्या घरी जीवनयात्रा संपवली आहे. प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Ratnagiri crime News
Pune News: वाढदिवशीच तरुणावर काळाचा घाला! सेल्फी काढण्याच्या नादात बुडून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील संजय सदा निकम वय 33 वर्षे व सोनाली संजय निकम वय 25 वर्षे असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. यातील संजय निकम याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने सोनाली हिच्याशी प्रेमविवाह केला होता.

नेमकं काय घडलं?

संजय आणि सोनाली हे दोघे आज, सोमवारी दुपारी दोघेही मजुरीचे काम करू त्यांच्या घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी रोजच्या प्रमाणे जेवण करण्यास घेतले. मात्र, यावेळी त्यांनी त्यांच्या जेवणात विष टाकले. या दोघांनी जेवणासहित विष घेऊन झोपी गेले. सायंकाळी बकऱ्या चरायला घेऊन गेलेली आजी घरी परतली.

Ratnagiri crime News
माझ्याकडे ऑडी कार आहे... पत्ता विचारल्याच्या रागातून अंगावर घातली गाडी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

आजी घरी परतल्यानंतर त्यांनी या दोघा नवरा-बायकोला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कोणताच प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावले. त्यानंतर या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या संपूर्ण घटनेबाबत मृत पती-पत्नीच्या आजी यांनी रात्री उशिरा शिरगाव पोलीस स्थानकामध्ये तक्रार देण्यासाठी धाव घेतली आहे. आत्महत्या केल्याचे कळताच आजीने मोठा टाहो फोडला. तर जोडप्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, संजय सदा निकम व सोनाली संजय निकम या जोडप्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. आर्थिक संकटाला कंटाळून जोडप्याने पाऊल उचललं का, की काही इतर काही कारण आहे, हे समोर आलं नाही. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com