Ratnagiri Crime News : बापरे! रेशनच्या दुकानात चक्क प्लास्टीक तांदळाची विक्री; का होतोय नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?

अनेक रेशन दुकानदार जास्ता पैशांसाठी गोरगरिबांच्या वाटेला आलेलं धान्य ब्लॅकने विकतात.
Ration
RationSaam tv
Published On

Rationing Shop : गरीब आणि गरजू व्यक्तींना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी सरकारमार्फत नागरिकांना मोफत रेशन पुरवले जाते. अशात रेशमध्ये मिळत आसलेलं धान्य खराब असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे. अनेक रेशन दुकानदार जास्ता पैशांसाठी गोरगरिबांच्या वाटेला आलेलं धान्य ब्लॅकने विकतात. (Marathi News)

रत्नागिरी जिल्ह्यातून रेशनमधील धान्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. रेशनच्या तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळले आहेत. निळीक गावातील ग्रामस्थांनी यामुळे मोठा संताप व्यक्त केला आहे. भोस्ते येथील रेशन दुकानातून ग्रामस्थांनी हे तांदूळ विकत घेतले होते.

Ration
Chennai Crime News: एक्स बॉयफ्रेंडचे बारिक तुकडे करून जमिनीत पुरलं...; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्यातील निळीक या गावात रेशन दुकानातून खरेदी केलेल्या तांदळाच्या पोत्यात चक्क प्लास्टिकचे तांदूळ आढळले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गावात उत्सव साजरा केला जातो, तसेच भंडाऱ्याचे देखील आयोजन केले जाते.

त्यासाठी निळीक येथील ग्रामस्थांनी भोस्ते गावातील रेशन दुकानातून 50 किलोच्या दोन गोण्या म्हणजे एकून शंभर किलो तांदूळ खरेदी केला. हा तांदूळ निवडत असताना महिलांना प्लास्टीक सदृश्य तांदूळ आढळले आहेत, गावकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. नागिराकांना स्वस्त:दरात मिळणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असते. अनेक रेशन दुकानात काटा मारून धन्य दिले जाते.

Ration
Kandivali Crime News : संतापजनक! प्लेग्रुपमध्ये चिमुकल्यांचा अमानुष छळ; काळीज पिळवटून टाकणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

काही ठिकाणी धान्यात जास्तीचे खडे आढळले आहेत. तर काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात धान्यात किड असल्याचे दिसते. रेशनचे असे धान्य खाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. प्लास्टीक हा एक अविघटनशील पदार्थ आहे. शरीरात प्लास्टीक गेल्याने मोठ्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com