Kandivali Crime News : संतापजनक! प्लेग्रुपमध्ये चिमुकल्यांचा अमानुष छळ; काळीज पिळवटून टाकणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

विद्यार्थ्यांना चिमटे काढणे, उचलून खाली आपटने अशा प्रकारे मारहाण करण्यात आली आहे.
Kandivali Crime
Kandivali Crimesaam tv
Published On

Kandivali Playgroup: कांदिवली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका प्लेग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. दोन शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना चिमटे काढणे, उचलून खाली आपटने अशा प्रकारे मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन्ही शिक्षकांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबईच्या कांदिवली परिसरात असलेल्या प्लेग्रुपमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. येथे दोन ते अडीच वर्षांच्या मुलांच्या जीवाशी खेळ केला गेला आहे. या प्लेग्रुपमध्ये 28 लहान मुलं आहेत. या चिमुकल्यांची काही चूक नसताना त्यांना हा त्रास सहन करावा लागला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Kandivali Crime
Video Viral : मेट्रोत दोन महिला एकमेकींना भिडल्या; जागेसाठी थेट मिरची स्प्रे काढला अन्...

संचालकांनी समोर आणला व्हिडिओ

सदर घटनेत मुलांना रोज अशी वागणूक मिळत असल्याने मुलांच्या वागण्यात बदल झाला होता. त्यामुळे काही पालकांनी मुलांना नीट शिकवत नसल्याची तक्रार केली. या प्लेग्रुपमध्ये 2 शिक्षक आणि 2 मदतनीस महिला आहेत. संचालकांना तक्रार केल्यावर त्यांनी दोन्ही शिक्षकांना काहीही न सांगता प्लेग्रुपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी त्यांना शिक्षकांची राक्षसी वृत्ती दिसली. हे पाहून संचालकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण या ठिकाणी मुलांना अतिशय क्रूर वागणूक दिली जात होती. लहान मुलं अनेकदा हट्टीपणा करतात त्यामुळे हे शिक्षक त्यांना हातात जे मिळेल त्याने मारत होते.

सदर व्हिडिओ पाहिल्यावर त्यांनी ही माहिती सर्व पालकांना दिली. यावर पालक फार संतापले. त्यांनी तात्काळ कांदिवली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.

Kandivali Crime
Viral News : प्रवाशांच्या 'या' चुकीमुळे रेल्वेच्या तिजोरीत जमा झाले तब्बल 70 कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

लहान मुलं म्हणजे एक कोरी पाटी असते. त्यांच्यावर जसे संस्कार केले जातात तसेच ते वागतात. मात्र या प्लेग्रुपमधील काही विद्यार्थी घरात सतत चिडचिड करत होते. तिथे शिक्षक जसे त्यांच्याशी वागायचे तसेच ही मुलं हाताला मिळेल ते फेकायचे. त्यामुळे पालकांनी प्लेग्रुपच्या संचालकांना याबाबत विचारल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com