Video Viral
Video ViralSaam TV

Video Viral : मेट्रोत दोन महिला एकमेकींना भिडल्या; जागेसाठी थेट मिरची स्प्रे काढला अन्...

सध्या सोशल मीडियावर महिलांच्या भांडणाचा असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

Woman Attacks : महिलांच्या भांडणाचे आजवर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सुरूवातीला महिला पाण्याच्या नळावर भांडताना दिसायच्या. मात्र आता दिवस बदलले आहेत. आता महिला ट्रेनमध्ये भांडताना दिसतात. मग यामध्ये फक्त लोकल ट्रेन नाही तर फस्टक्लास आणि अगदी मेट्रो ट्रेनमध्ये देखील महिलांची भांडणे पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर महिलांच्या भांडणाचा असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. (Mirchi Spray)

भांडताना अनेक महिला एकमेकींना मारहाण करतात तर काही जणी एकमेकींच्या झिंज्या उपटताना दिसतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिलांनी आपल्या भांडणाला थोडा ऍडवान्स वे दिला आहे. या महिलांनी एक मेकींशी हाणामारी करून दमल्यावर थेट मिरची स्प्रे बाहेर काढला.

Video Viral
Crime News : जीव वाचवला म्हणून पित्यानेच केली मुलीची हत्या; धक्कादायक घटनेनं जम्मू-काश्मीर हादरलं

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन महिला मेट्रोमध्ये बसण्याच्या जागेवरून जोरदार भांडत आहेत. यामध्ये त्यांचं भांडण अगदी स्पष्ट ऐकू येत आहे. दोघीही एकमेकींना मारण्याची भाषा करत आहेत. अशात जर तुम्ही व्हिडिओ निट पाहिला तर समजते की, या ट्रेनमध्ये अजिबात गर्दी नाही. शिवाय या महिला ज्या सीटवर बसल्या आहेत तिथे आणखीन एक महिला बसू शकेल एवढी जागा शिल्लक आहे.

मात्र तरी देखील या महिला एकमेकींशी मोठमोठ्याने भांडत आहेत. यात एक महिला दुसरीला म्हणते की शांत बस नाही तर मी तुला मरेल. त्यावर दुसरी महिला म्हणते की हो मारना तुझ्यासारख्या महिलांसाठीच मी मिरची स्प्रे घेऊन आले आहे.

Video Viral
Gautami Patil : गौतमी पाटील पुण्यात नेमकी कुठे राहते? जाणून घ्या तिच्या घराचा पत्ता

त्यानंतर या दोन्ही महिलांची एकमेकींशी मारामारी होते आणि एक महिला दुसरीच्या तोंडावर मिरची स्प्रे मारते. डोळ्यांची आग झाल्यावर ती महिला शांत बसते. त्यानंतर ज्या जागेवरून एवढी भांडणं झाली तेथून स्प्रे मारणारी महिला गप्प निघून जाते. महिलांचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी पोट दुखेपर्यंत हसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com