म्हसवड येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या (dhangar samaj) आंदोलनाच्या 14 व्या दिवशी धनगर समाज आज (शुक्रवार) अचनाक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेकडाे आंदाेलकांनी सातारा पंढरपूर महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन (Rasta Roko Andolan At Satara Pandharpur Highway) छेडले. (Maharashtra News)
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगड ऐवजी धनगर या शब्दाच्या दुरुस्तीची शिफारस करावी या प्रमुख मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे 13 दिवसांपासून धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदाेलनामध्ये काहींनी उपाेषण सुरु केले आहे.
आंदाेलकांनी उपोषण स्थगित करावे यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी आंदाेलकांशी चर्चा केली. त्यावेळी आंदाेलकांनी बैठकीची तारीख निश्चित झाल्याशिवाय आंदाेलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान आज धनगर समाज अचनाक रस्त्यावर उतरला. शेकडाे जणांनी एकत्रित येत सातारा पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोकाे आंदाेलन केले. सुमारे एक तासाहून अधिक वेळ हे आंदाेलन सुरु राहिल्याने सातारा पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.