धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मेहेकर ते रिसोड मार्गावर आज (शुक्रवार) धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोकाे आंदाेलन छेडण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. (Maharashtra News)
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांत धनगर समाज आंदाेलन करीत आहे. गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील सोनाटी या गावातील 200 फुट उंच मोबाईल टाॅवरवर चढून गजानन बोरकर यांनी आंदोलन केले.
जिल्ह्यातील धनगर समाज आजही आक्रमक असल्याचे पाहयला मिळाले. मेहेकर रिसोड मार्गावर समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या आंदाेलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी रस्त्यावर टायर जाळून दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. आंदाेलकांनी सरकारच्या विरोधात जाेरदार घोषणाबाजी देखील केली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.