"राहुल गांधी सांड" रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली
"राहुल गांधी सांड" रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली लक्ष्मण सोळुंके

"राहुल गांधी सांड" रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली

सतत वादग्रस्त वक्तव्य आणि गावरान भाषेत राजकीय टोले लगावणारे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Published on

जालना : सतत वादग्रस्त वक्तव्य आणि गावरान भाषेत राजकीय टोले लगावणारे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा -

भाजपची जन आशीर्वाद यात्रा आज जालन्यातील बदनापूरमध्ये पोहचली आहे. या वेळी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांचा आमदार नारायण कुचे यांच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत राहुल गांधी सांड असून कोणत्याच कामाचे नाहीत असं म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. लोक जनावरं जशी देवाला सोडतात त्यानंतर ती जनावरं कोणत्याच कामाला चालत नाही तसे राहुल गांधी असून ते पंतप्रधान पदासाठी निष्क्रिय असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

"राहुल गांधी सांड" रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली
समृद्धी महामार्गावरील तेरा कामगारांचा अंगावर लोखंडी रॉड्स पडून मृत्यू... (व्हिडीओ)

या वेळी कार्यकर्त्यांत मोठा हशा पिकाला होता. नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असणारे दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांना चक्क सांड म्हटले आहे. यावर आता काँग्रेस मधून जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com