Lok Sabha Election : महायुतीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढणार? आठवलेंना डावलल्याने RPIचे कार्यकर्ते आक्रमक, दिला मोठा इशारा

Ahmednagar political news : महायुतीकडून आठवलेंना शिर्डीची जागा मिळाली नाही, यामुळे आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha Election Saam tv

सचिन बनसोडे, अहमदनगर

Ramdas Athawale Latest News :

लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये काही जागांवरून तिढा कायम आहे. नाशिकमधून उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आग्रही आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी रामदास आठवलेंनी शिर्डीची जागा मिळावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, महायुतीकडून आठवलेंना शिर्डीची जागा मिळाली नाही, यामुळे आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महायुतीने आरपीआय आठवले शिर्डीची जागा न सोडल्याने आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाने उमेदवार मागे घेऊन शिर्डीचा जागा रामदास आठवले यांना सोडावी, अन्यथा आरपीआय शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचा निर्धार रिपाईच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.

Lok Sabha Election
Lok Sabha Election 2024: 'कुणी कितीही करू द्या कल्ला, तुमच्या पाठीशी यवतमाळ-वाशिम जिल्हा'; भावना गवळींच्या समर्थकांची पोस्टरबाजी

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले हे सुरूवातीपासून शिर्डी मतदारसंघासाठी आग्रही होते. मात्र ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आली असून उमेदवारही जाहीर करण्यात आला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्ते आजही आग्रही आहेत. त्यामुळे श्रीरामपूर येथे निर्धार मेळावा घेत शिर्डीचा उमेदवार बदलावा. तसेच ही जागा आठवलेंना सोडली जावी, अशी मागणी करत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Lok Sabha Election
Patanjali ads case : आम्हाला माफी मान्य नाही, बाबा रामदेव यांच्या माफीनाम्यानंतरही सुप्रीम कोर्टाने झापलं

लोकसभेची निवडणूक आरपीआय आठवले गटाच्या अस्तित्वाची असून महायुतीला राज्यात निवडून येण्यासाठी आरपीआयच्या मतांची गरज आहे. त्यामुळे शिर्डी आणि सोलापूरची जागा आठवले गटाला दिली जावी अन्यथा अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी दिला आहे.

Lok Sabha Election
Ramdas Athawale: केंद्रात कॅबिनेटसह राज्यात मंत्रिपद देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले: रामदास आठवले

देवेंद्र फडवणवीस यांच्या भेटीनंतर रामदास आठवले काय म्हणाले होते?

शिर्डीसाठी आग्रही असलेल्या रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर म्हणाले होते की, 'शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह होता. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना अडचण होती. या जागेसाठी फडणवीसांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. शिंदे यांच्यासोबत खासदार आले होते, त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं. फडणवीस यांना २०२६ ला माझी राज्यसभा संपते. त्यांनी मला पुन्हा राज्यसभेवर पाठवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्रिपद आहे.आता कॅबिनेट मंत्रिपदासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com