Ramdas Athawale: केंद्रात कॅबिनेटसह राज्यात मंत्रिपद देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले: रामदास आठवले

Ramdas Athawale News: मी योग्य दिशेने पुढे चाललोय त्यामुळे तरुणांनी माझ्यासोबत यावं, भाजपसोबत असलो तरी किमान समान कार्यक्रमवर अशी युती केली आहे: रामदास आठवले
Ramdas Athawale Latest News
Ramdas Athawale Latest Newssaam tv
Published On

>> अभिजित देशमुख

Ramdas Athawale Latest News:

''मी योग्य दिशेने पुढे चाललोय त्यामुळे तरुणांनी माझ्यासोबत यावं, भाजपसोबत असलो तरी किमान समान कार्यक्रमवर अशी युती केली आहे. एकट्याच्या ताकदीवर सत्तेत येणं शक्य नसेल तर मित्र पक्षाच्या ताकदीवर पुढे आलं पाहिजे. इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवण्याचं काम करते. भारत जोडो यात्रा काढत भारत तोडतेय, भाजपामध्ये परिवर्तन झालं आहे. आता भाजप बदललाय, भाजप हा सर्व जाती धर्मपंथांचा पक्ष आहे, संविधान बदलेल ही अफवा आहे, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले डोंबिवलीत आयोजित राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेसाठी आले होते. त्यावेळी ते असं म्हणाले आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बच्चू कडू यांची समजूत काढू - रामदास आठवले

नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात शड्डू ठोकलाय. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी याआधीही असे अनेक विषय मिटवलेत आहे. हा विषय मिटावा म्हणून मी स्वतः बच्चू कडू यांच्याशी बोलणार आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.  (Latest Marathi News)

Ramdas Athawale Latest News
Dhule Lok Sabha: धुळ्यात कोणत्या पक्षाचा निवडून येणार खासदार? युती जिंकणार की, मविआ बाजी मारणार? जाणून घ्या स्थानिक परिस्थिती

वंचितचा निर्णयाचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून समर्थन

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमधून जवळपास बाहेर पडल्याच निश्चित झालंय. याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचितचा हा योग्य निर्णय असल्याचे सांगितले. वंचितने काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरेदी यांना महाविकास आघाडीला पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे, असं ते म्हणाले आहेत.

फडणवीस यांच्याकडून केंद्रात कॅबिनेटसह राज्यात मंत्रिपद देण्याच्या आश्वासन: रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. मात्र शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आठवले नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत बोलताना आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह होता. मात्र एकनाथ शिंदे यांना अडचण होती. देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते, त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांनी 2026 ला माझी राज्यसभा संपते, त्यांनी मला पुन्हा राज्यसभेवर पाठवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्रीपद आहे, आता कॅबिनेट मंत्री पदासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ramdas Athawale Latest News
India Alliance: अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची तात्काळ सुटका करा; इंडिया आघाडीच्या या आहेत 5 मोठ्या मागण्या

राज्य मंत्रिमंडळ होणाऱ्या विस्तारात देखील आरपीआयला जागा दिली जाईल असे देखील आश्वासन दिल्याचं आठवले यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या कार्यक्रमांमध्ये आरपीआयचा झेंडा दिसत नाही, याबद्दल थोडी नाराजी होती. मात्र येथून पुढे आरपीआयला सन्मान दिला जाईल, असा आश्वासन फडणवीस यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कालखंडात बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक स्मारकांचे काम केले. त्याचप्रमाणे इंदूमिल येथील स्मारकाचे काम देखील सुरू आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील, असा विश्वास यावेळी रामदास आठवले यांनी बोलून दाखवला. तसेच संविधान कोणी बदलू शकत नाही, संविधानाला अजिबात हात लावू देणार नाही, असे आठवले यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com