Maharashtra Politics: मंत्र्यांच्याही मुली असुरक्षित, सर्वसामान्यांचं काय? मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची काढली छेड, पाहा स्पेशल रिपोर्ट

Minister's Daughter Harassed in Public: राज्यात मंत्र्यांच्याच मुली सुरक्षित नसल्याचं समोर आलंय. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड काढण्यात आलीय. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर यात्रेतील हा धक्कादायक प्रकार आहे. पाहूया एक रिपोर्ट...
 Shocking Harassment of Minister Raksha Khadse's Daughter
Shocking Harassment of Minister Raksha Khadse's DaughterSaam Tv
Published On

महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरुन महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरण ताजं असतानात जळगावमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय. खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवातला हा धक्कादायक प्रकार घडला. काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. यावर रक्षा खडसे चांगल्याच संपातल्य आणि त्यांनी थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जात घटनेच्या तपासावरून पोलिसांची खरडपट्टी काढली.

 Shocking Harassment of Minister Raksha Khadse's Daughter
Maharashtra Politics: उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधक कोणत्या मुद्यांना हात घालणार?

छेड काढणारे शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होतोय. दरम्यान पोलिसांच्या निष्क्रियतेवर एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी ताशेरे ओढलेत. मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे हे एका विशिष्ट पक्षाचे असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

पोलिसांनी आरोपींची नावं सांगितली आहेत. त्यांच्या विरोधात विनयभंग आणि पॉक्सो कायदा अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या निमित्ताने एक गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. जिथे मंत्र्यांच्याच मुली असुरक्षित आहेत तिथे सर्वसामान्यांच्या लेकींच्या सुरक्षेचं काय ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com