Maharashtra Politics: उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधक कोणत्या मुद्यांना हात घालणार?

Budget Session Begins Tomorrow: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन चांगलेच गाजणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन
अर्थसंकल्पीय अधिवेशनSaam Tv
Published On

ओमकार सोनवणे, साम टीव्ही

मुंबई: उद्यापासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून,सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण,पुण्याच्या स्वारगेट बस डेपोतील बलात्काराची घटना यासह माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी सातत्याने होत आहे. यावरून उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस हा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन
Sanjay Raut: मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला राऊतांची हजेरी, शरद पवार गटाने शिकवला प्रामाणिकपणाचा धडा

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर महाविकासआघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू होते.दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर ठाकरेंची सेना ही नाराज होती हे खुद्द ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवले.गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीत समन्वयाचा पूर्ण अभाव दिसत आहे.अशा परिस्थितीत अधिवेशनामध्ये विरोधकांची वज्रमुठ दिसेल कि नाही यावर ते सत्ताधाऱ्यांना कितपत धारेवर धरू शकतील,हे बघणे औत्सूक्याचे ठरणार आहे .

अर्थसंकल्पीय अधिवेशन
Datta Gade : दत्ता गाडेच्या मोबाईलचा तपास सुरु, कुणाकुणाला फोन अन् कुणाला पैसे पाठवल्याची चौकशी करणार

मुंडे कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी कोंडी

बीड जिल्ह्यातील वाढलेली गुंडगिरी आणि कृषि खात्यातील भष्टाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.तसेच अगदी काही दिवसापूर्वी नाशिकच्या न्यायालयाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.त्यांच्या देखील राजीनाम्याबाबत विरोधक दबाव आणण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन
Beed Politics: ...नाही तर एमआयएममध्ये जाईल, बीडमध्ये महायुतीत जुपली; राष्ट्रवादीच्या नेत्याचा थेट इशारा

विरोधकांचा चहापानवर बहिष्कार

विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या चहापानवर बहिष्कार घालत असल्याचे सांगितले. यापत्रकार परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,जितेंद्र आव्हाड,भाई जगताप आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते.

अंबादास दानवे म्हणाले, सुनील केदार यांना शिक्षा झाली तेव्हा 24 तासात त्यांचे विधानसभा सदस्य रद्द केले होते. लोकसभेत देखील राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मात्र आता तसे होत नाहीये. मागील कृषि मंत्र्यांचे घोटाळे समोर येत आहेत, राज्यातील कायदा सुव्यवस्था देखील ढासळली आहे.

तसेच स्वारगेट बलात्कार प्रकरणात राज्याचे गृहराज्यमंत्री असंवेदनशीलपणे बोलत आहेत. अशा लोकांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. वल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे या सगळ्या मुद्यांवरून अंबादास दानवे यांनी हल्लाबोल चढवला आणि चहापानवर बहिष्कार घालत असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com