Politics: "माझ्या नादाला लागू नका नाहीतर नाXXX करेन" संजय राऊतांचा अजित पवार गटाच्या नेत्याला थेट इशारा

Sanjay Raut Slams Praful Patel: प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना बाबरी पाडण्याबाबत टोला हाणला. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेलांवर प्रहार केला.
Sanjay Raut
Sanjay RautSaam
Published On

वक्फ विधेयकावरून राज्यसभेत चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील खासदार प्रफु्ल्ल पटेल यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळालं. त्यांनी भरसभेत बाबरी पाडण्याच्या श्रेयवादावरून संजय राऊत यांना डिवचले. प्रफुल्ल यांनी डिवचल्यानंतर संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर प्रहार केला. "माझ्या नादाला लागू नाहीतर...करेन" अशा तिखट शब्दात राऊतांना इशारा दिला.

प्रफुल्ल पटेल दलाल

प्रफुल्ल पटेल हे दलाल आहेत. पटेलांसारखी माणसं कुणाचीच नसतात, ते फक्त दलाल आहेत. कधी काँग्रेसची दलाली, कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना शरद पवार यांना बाप बाप करत होते. तर, कधी दाऊदचीही दलाली करत होते. त्यांची इथे आल्यावर संपत्ती मोकळी झाली. ती पण हजारभर कोटींची. अशा लोकांची भर संसदेत उभं राहून बोलण्याची लायकी आहे का? अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केलीय.

Sanjay Raut
Train Accident: हृदयद्रावक! आधी सासूला उडवलं, नंतर सुनेलाही रेल्वेची धडक; काही मिनिटांत दोघींचा मृत्यू

माझी नादी लागू नका नाहीतर..

आम्ही रंग कसले बदलले? आम्ही बाळासाहेब यांच्या पक्षात आहोत. तुमचे रंग आधी पाहा. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा रंग हिरवा लागलेला आहे आणि तुम्ही वक्फवर बोलताय? मी प्रफुल्ल पटेल यांना सागंतो की, तुम्ही माझ्या नादी लागू नका, नाहीतर XXXकरेन मी", अशा शब्दात संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेल यांना थेट इशारा दिला आहे.

Sanjay Raut
Pune News: संतापजनक! 'तुझ्या मुलाला ५० हजारात विक', आईचा स्पष्ट नकार; नराधमाने चिमुकल्याला उचललं आणि..

भाजपनेही स्वत:ची लायकी काढली

प्रफुल्ल पटेलांसह राऊतांनी भाजपवरही टीका केली, "इतिहास काढायला लागलो तर, त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल. ही लोक फडणवीस यांच्या बाजूला बसतात, काय लेव्हल आहे का त्यांची फडणवीस यांच्या बाजूला बसायची? हे लोक वाकलेले आहेत. त्यांना पाठीचा कणा नाही आणि हेच लोक महाराष्ट्रचं नेतृत्व संसदेत करतात. भाजपही अशा लोकांना खांद्यावर घेऊन बसत आहे. असं करून भाजपने स्वत:ची लायकी काढली आहे", अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com