Rajya Sabha Election: सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतील रिक्त जागेवर कोणाची लागणार वर्णी? बड्या नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

Rajya Sabha By- Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर कोणाची निवड होणार यावरून राजकीय चर्चा तीव्र झाली आहे.
Rajya Sabha Election:
CHHAGAN BHUJBAL’S NAME EMERGES FOR SUNETRA PAWAR’S VACANT RAJYA SABHA SEATSaam Tv
Published On
Summary
  • सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्याने राज्यसभा जागा रिक्त.

  • १८ जून रोजी पोटनिवडणूक होणार.

  • छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी येत्या १८ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त असून या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पोटनिवडणूक घोषित केली आहे. घोषित पोटनिवडणुकीची अधिसूचना १ जून रोजी जारी केली जाणार आहे.

Rajya Sabha Election:
Maharashtra Fuel Crisis: राज्यात महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा; मंत्री छगन भुजबळांच्या विधानाने भरली धडकी

पुन्हा पोटनिवडणूक

सन २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची मुदत शिल्लक असतानाही त्यांना २०२४च्या द्विवार्षिक निवडणुकीत उमेदवारी दिलेली. राज्यसभेवर नव्याने निवडून आल्यानंतर पटेल यांनी राज्यसभेच्या एका जागेचा राजीनामा दिला होता.

त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीद्वारे राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. आता त्यांची राज्यसभेची मुदत ४ जुलै २०२८ पर्यंत होती. आता याच जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक होत असल्याने पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला दोन वर्षाचा कालावधी मिळणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटात उमेदवारीचा पेच

या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. भुजबळ यांनीही यापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेवर जाण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केलेली होती. त्यामुळे पक्षाकडून त्यांचे नाव निश्चित होऊ शकते. परंतु राज्यसभेची उमेदवारी दिल्यास पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वासमोर भुजबळ यांच्या उमेदवारीचा पेच आहे.

Rajya Sabha Election:
सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करा, निवडणूक बारामतीची, चर्चा मुख्यमंत्रिपदाची

१० राज्यांतील २४ जागांसाठी निवडणूक

१० राज्यांतील राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २१ जून ते १९ जुलैदरम्यान वेगवेगळ्या तारखांना संपणार आहे. त्यामुळे संबंधित रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. १८ जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. राज्यसभेतील २४ नेत्यांचा कार्यकाळ संपतोय.

यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांचा समावेश आहे. त्याशिवाय २ जागांवर पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासह सुनेत्रा पवार यांच्या जागेचाही समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com