Raju Shetti In Solapur : बच्चू कडू साेबत आले तर एक से भले दाे ! राजू शेट्टी (पाहा व्हिडिओ)

आज विविध समस्यांवर राजू शेट्टी यांनी सरकारला घेरले.
Raju Shetti, Bachchu Kadu
Raju Shetti, Bachchu Kadusaam tv

Raju Shetti News : बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची सरकारमध्ये घुसमट होत आहे. ते आमच्या सोबत आले तर त्यांचे आम्ही स्वागतच करू असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti latest marathi news) यांनी व्यक्त केले. शेट्टी हे साेलापूर (solapur) जिल्हा दाै-यावर आले हाेते. त्यावेळी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना आगामी काळात हाेणा-या निवडणुकांसाठी स्वाभिमानी सज्ज असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra News)

Raju Shetti, Bachchu Kadu
Tuljapur Bandh News : तुळजापूर बंद ठेवणे याेग्य नाही, राणाजगजितसिंह पाटलांची आराखड्याबाबतची पूढची दिशा स्पष्ट

राजू शेट्टी म्हणाले आगामी निवडणुका स्वाभिमानी स्वबळावर लढणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दुष्काळ जाहीर करु नये असे म्हटले पण आमचं म्हणणे आहे आगामी काळात पाण्याअभावी भयवाह परिस्थिती निर्माण हाेणार आहे.

खरंतर सरकारमध्ये बच्चू कडूंची घुसमट होत आहे. त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे. दुष्काळ जाहीर केल्याशिवाय चारा छावण्या सुरु हाेणार नाहीत. राेजगार हमीची याेजना सुरु करावी लागेल कारण बेराेजगारीचा प्रश्न माेठा आहे. दरम्यान चळवळीतील लाेक एकत्र आले तर बरं आहे. एक से भले दाे त्यामुळे त्यांचे स्वागत करू असे मत देखील शेट्टी यांनी व्यक्त केले.

त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांचे विचार आणि विचार करण्याची शैली वेगळी आहे. ते फार मोठ्या उंचीचे नेते आहेत त्यामुळं जमेल असं वाटत नाही असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित आघाडीसोबत जाणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Raju Shetti, Bachchu Kadu
Kalyan News : डोंबिवली पाठोपाठ कल्याणचा पाणी प्रश्न ऐरणीवर, KDMC वर सेनेच्या नेत्रा उगलेंची धडक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com