Tuljapur Bandh News : तुळजापूर बंद ठेवणे याेग्य नाही, राणाजगजितसिंह पाटलांची आराखड्याबाबतची पूढची दिशा स्पष्ट

तुळजापूरात कडकडीत पाळण्यात आलेला आजचा बंद शहरवासियांनी मागे घ्यावा असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.
Ranajagjitsinha Patil
Ranajagjitsinha Patilsaam tv
Published On

- बालाजी सुरवसे

Ranajagjitsinha Patil News : काही विशिष्ट लोक आपल्या स्वार्थासाठी अपप्रचार करीत आहेत. सर्वाना विचारात घेऊन तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखडा (Tuljabhavani Temple Development Plan) तयार करणार आहाेत अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील (mla ranajagjitsinha patil) यांनी नमूद केले. तुळजापुर बंद करणे मला याेग्य वाटत नाही. त्यातून भाविकांना त्रास हाेईल असे मत आमदार पाटील यांनी तुळजापुर बंदच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून व्यक्त केली आहे. (Maharashtra News)

Ranajagjitsinha Patil
Vishwa Hindu Parishad : मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारा अफझलखान कोण काका, मामा लागतो का ? शंकर गायकर

तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाची इच्छित जागा निश्चित व्हावी यासाठी आज (बुधवार) शहरवासियांनी तुळजापुर शहरात बंद पाळला आहे. दर्शन मंडप हा घाटशिळ ऐवजी तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Ranajagjitsinha Patil
Sangli Crime News : आईच्या हंबरड्याने पाेलीसांचेही मन हेलावले, म्हैसाळच्या कालव्यात सापडला युवकाचा मृतदेह, पाच अटकेत (पाहा व्हिडिओ)

दरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी समाज माध्यमातून सर्वांना विश्वासात घेवूनच तुळजापूरचा विकास आराखडा अंतिम होणार असल्याचे नमूद केले आहे. यामध्ये आमदार पाटील यांनी हा आराखडा तयार करताना पुजारी, स्थानिक नागरिक, व्यापारी व भाविक भक्तांसह सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम केला जाणार आहे.

यापूर्वीच्या सूचनांचा अंतर्भाव करून 'सुधारित प्रारूप आराखडा' प्रकाशित करण्यात आला. यामध्ये सर्वांना आपल्या सूचना मांडण्याचे आवाहन देखील करण्यात आले. स्थानिक नागरिक ,पुजारी,व्यापारी व भाविक भक्तांच्या सोयी-सुविधा व हित विचारात घेवूनच विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. मात्र काही अप प्रवृत्ती जाणीवपूर्वक गैरसमज पसरवीत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी व क्लेशदायी आहे असेही आमदार पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com