Rajkot Shivaji Mahajar Statue: चुका पुन्हा घडणार नाहीत, ज्यांनी केल्या त्यांना शिक्षा होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस

Deputy Chief Minister Devendra Fadnavis : मालवण घटनेवरुन कोणीही राजकारण करू नये. अशी विनंती करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिलीय.
Rajkot Shivaji Mahajar Statue: चुका पुन्हा घडणार नाहीत, ज्यांनी केल्या त्यांना शिक्षा होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस
Devendra FadnavisSaam Tv
Published On

मालवणच्या घटनेवर कोणीच राजकारण करू नये. ही घटना कमीपणा आणि दुःखद घटना आहे. एकत्र योग्य चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. सगळ्यांनी चुका पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यावी. तर ज्यांनी केल्या त्यांना शासन होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिलीय.

आठ महिन्यांआधी मालवणमधील राजकोटच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. आठ महिन्यानंतर महाराजांचा हा पुतळा कोसळल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली. यावरून राज्यातील राजकारण तापलंय. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत.

शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करून नये अशी विनंती केलीय. मालवणमधील घटनेवर कोणीच राजकारण करू नये. निश्चितपणे ही घटना कमीपणा आणि दुःखद आहे. एकत्र योग्य चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्या जागेवर आता भव्य पुतळा उभारला पाहिजे, या तिन्ही गोष्टी केल्या जातायेत, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

Rajkot Shivaji Mahajar Statue: चुका पुन्हा घडणार नाहीत, ज्यांनी केल्या त्यांना शिक्षा होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस
Fraud News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पी. ए असल्याचे सांगत १५ लाखांची फसवणूक; राजकीय वर्तुळात खळबळ

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना राजकारण न करण्याची विनंती केलीय. दोषींना शोधण्यासाठी नेव्हीने चौकशी टीम तयार केली आहे. या पथकाने घटनेची पाहणी केलीय. नेव्ही दोषींवर कारवाई करणार आहे. बांधकाम विभागाने पोलिसात तक्रार केलीय. नेव्हीच्या रिपोर्ट नंतर पोलीस कारवाई करणार आहे, जे सिविलीयन त्या टीममध्ये होते, त्यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिलीय. मुख्यमंत्र्यांनी सांगीतिक भव्य पुतळा उभारू तसेच जे जे करणे आवश्यक होते ते केले जातंय, असंही उपमुख्यमंत्री म्हणालेत.

फडणवीसांची विनंती

विरोधकांनी या घटनेचं राजकरण सुरू केले आहे. निवडणुकाच्या चष्म्याने पाहायचे असे करून राजकारण करू नये. सगळ्यांनी चुका पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्या , ज्यांनी केल्या त्यांना शासन होईल. आता कोणी काय केलं हे बोलणार नाही, सर्वांना विनंती आणि सूचना आहे. विषयाचे राजकारण करणे महाराष्ट्राला शोभत नसल्याचं फडणवीस म्हणाले.

शरद पवार यांच्यावर टीका

शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. हा पुतळा नेव्हीने तयार केला आहे, तर राज्यसरकारने तयार केलेला नाही, हे त्यांना माहिती आहे. भ्रष्टाचार कुठेच नको. त्याला शरद पवार काय सगळ्यांचाच विरोध असला पाहिजे. परंतु शरद पवारांनी असं वक्तव्य करून ते इतर ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराचं समर्थन देतात का? असा सवाल फडणवीस यांनी केलाय. राजकीय वक्तव्य निवडणुका डोळ्याससमोर शरद पवार असं विधान करत आहेत. पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडणुका पाहून असे वक्तव्य करण्यासोबत नसल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय.

Rajkot Shivaji Mahajar Statue: चुका पुन्हा घडणार नाहीत, ज्यांनी केल्या त्यांना शिक्षा होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस
MP Praniti Shinde: सरकार बाहेरून भक्कम आतून पोकळ; राजकोटमधील पुतळा घटनेवरून खासदार प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com