जमिनी विकू नका, आपण संपू, राज ठाकरेंना वेगळीच शंका; पनवेलमध्ये मराठी तरूण-तरुणींना दिली हाक

Raj Thackeray Panvel Full Speech : राज ठाकरे यांनी पनवेल मेळाव्यात जमिनी विकू नका, असा इशारा दिला. रायगडमध्ये परप्रांतीयांचे अतिक्रमण, डान्सबारचे वाढते प्रमाण यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
Raj Thackeray
Raj Thackeray X
Published On
Summary
  • पनवेलमधील मेळाव्यात राज ठाकरे यांनी जमिनी विकू नका असा इशारा दिला.

  • रायगडमध्ये परप्रांतीयांची वाढती घुसखोरी आणि उद्योगांची अतिक्रमणावर चिंता व्यक्त केली.

  • डान्सबार वाढीव प्रमाणात सुरू असून त्यांचा मराठी संस्कृतीवर परिणाम होतोय, असं ते म्हणाले.

  • मराठी युवकांनी जमिनी विकण्याऐवजी त्या कंपनीत भागीदार होण्याचा सल्ला दिला.

Raj Thackeray speech on land sale in Raigad : आपल्या रायगडमध्ये कोण येतेय, कोण राहतेय, माहिती नाही. उत्तरेमधील अनेकांनी कोकणात जमिनीच्या जमिनी घेतल्या आहेत. आमच्या लोकांना इतके कळत नाही, यातून आपणच संपणार आहोत, असे म्हणत राज ठाकरे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली. तुमच्या जमिनी घेण्यासाठी आले तर जमिनी विकायच्या नाहीत, त्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून येणार असल्याचे सांगा, असे राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले. पनवेलमधील शेकपाच्या मेळाव्याला राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. सत्ताधाऱ्यांना इशारा देताना मराठी माणसाला आवाहन केले. आपल्या जमिनी विकू नका, वेळीच सावध व्हा, असे राज ठाकरे म्हणाले.

आज आपण या गोष्टी वाचवल्या नाहीत, तर काहीच राहणार नाहीत. रायगडमध्ये अमराठी आमदार नगरसेवक निवडून येतील, त्याला वेळ लागणार नाही. आपण सर्वांनी एकत्र यायला हवं. विमानतळावर १०० टक्के मराठी मुले-मुली कामाला लागले पाहिजेत, असे राज ठाकरे म्हणाले.

जमिनी विकू नका -

बाहेरचे उद्योगपती येणार जमिनी घेणार, वाटेल ते थैमान घालणार, आपल्याकडे काय राहणार.. जमिनी विकू नका. राज्य सराकरने अर्बन नक्षल कायदा आणलाय. तुम्ही जर कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतो, एकदा त्यांनी अटक करू देच, त्यांना दाखवतो. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग आणता येणार नाही. मराठी माणसाला सन्मान देऊनच उद्योग येतील, असे राज ठाकरे म्हणाले.

सर्वाधिक डान्सबार रायगडमध्ये -

सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये.. ते बंद झाले होते. तेही अमराठी लोकांचे आहेत. ते कसे काय सुरू आहे. रायगड जिल्हा आहे ना.. छत्रपतींची राजधानी आहे, इथे मग इथे हे काय सुरू आहे. छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत. तुम्हाला भरकटून टाकायचे आणि मूळ विषयावरून लक्ष विचलीत करायचे धंदे सुरू आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Vande Bharat Express : पुण्यातून धावणार आणखी एक वंदे भारत, रेल्वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल, वाचा सविस्तर

महाराष्ट्राला नख लावा, तुम्हाला दाखवतो -

मराठी आणि गुजराती लोकांची भांडणे लावायचे आणि त्यातून मते कशी काढू शकतो? त्यासाठी हे सत्ताधाऱ्यांचे सर्व सुरू आहे. पण आम्ही त्यावर लगेच रिअॅक्ट होणार नाही. तुम्हाला हवं ते आम्ही करणार नाही. तुमच्या कृतीमधून महाराष्ट्राला नख लागतेय, ते समजल्यावर अंगावर आल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

Raj Thackeray
BJP Politics : ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपचा गुजराती तडका, वाचा काय आहे मास्टारप्लॅन

महाराष्ट्र विकून मोठं होऊ नका -

बाहेरच्या राज्यात आपल्याबद्दल लाजिरवाणे बालले जाते. मराठी माणसे विकत घेण्यासारखी आहेत, असं बोलले जातेय. मराठी माणसे विकली जातात. जर असे असेल तर छत्रपतींचे पुतळे कशासाठी ठेवायचे. त्यांनी काय शिकवले हे विसरलात का? ज्यावेळी स्वाभिमान शून्य माणसं उरतता तेव्हा फक्त जिवंत प्रेते उरतात, हे बाबासाहेब पुरंदरे यांचे वाक्य आहे. तुम्ही जिवंत प्रेतासारखं राहू नका. तुम्ही मोठं व्हा.. पण महाराष्ट्र विकून मोठं होऊ नका. जमिनी विकू नका, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
अजित पवारांच्या NCP च्या माजी आमदाराला जिवे मारण्याची धमकी, विमानतळावर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गुजरातमध्ये बिहारीवर अन्याय, ते दिसत नाही का?

गुजरातमध्ये दोन वेळा बिहारी लोकांना हाकलून दिले. पहिल्यांदा २० हजार लोकांना हाकलले. बिहारी लोकांना हाकलून दिले, त्या अल्पेश ठाकूर याची बातमी नाही. राज ठाकरे जेव्हा मराठीसाठी बोलते तेव्हा संकुचित कसा असू शकतो?

आपली राज्य व्यवस्थित ठेवायचं अन् दुसऱ्या राज्यामध्ये गोंधळ घालायचा. जागे राहा, कान-डोळे उघडे ठेवा सतर्क राहा.. महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका, याची काळजी घ्या, असे राज ठाकरे म्हणाले.

आजार अन् राजकारण, काय म्हणाले राज ठाकरे?

हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचे राजकारण फारसे वेगळे नाहीत. हा या पक्षातून त्या पक्षात गेला, ते सारखं सुरूच आहे. त्यावर आपण काय म्हणतो.. व्हायरल होता. सध्या महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतात. स्वातंत्र्य मिळण्याआधी १२ दिवस, ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष ३ ऑगस्ट १९४७ रोजी पक्षाची स्थापना झाली. स्वातंत्र्याआधी स्थापन झालेला पहिला पक्ष शेतकरी कामगार पक्ष आहे. लाल ध्वजाच्या मंजावर २ भगवे ध्वज एकत्र आले आहेत. आमच्या मंचावर येऊन फक्त मराठीवर बोला असे जयंत पाटील यांनी सांगितले, असे राज ठाकरे म्हणाले.

मोदी-शाह यांचे गुजरात प्रेम, मग आम्ही का मराठीवर प्रेम करू नये -

रायगडमधी शेतकरी बरबाद होणार नाही, ते टिकवण्यासाठी काम करावे. मराठीसाठी तडजोड नाही, भुसेंनाही ठणकावून सांगितले.अनेक प्रकल्प गुजरातला गेले. मोदी-शाह यांना गुजराती प्रेम आहे, मग आपण का संकुचित राहणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तुम्ही महाराष्ट्रातून गुजरातला गेलात तर शेतजमीन विकत घेता येत नाही, असा कायदा केला आहे. देशाचे पंतप्रधान अन् गृहमंत्री गुजरातचे आहेत, त्या गुजरातमध्ये जाऊन जमीन विकत घेता येत नाही. प्रत्येकजण आपल्या राज्याचा विचार करत असतो, आपण का करायचा नाही, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com