MNS Raj Thackeray Latest News
MNS Raj Thackeray Latest NewsSaam TV

Raj Thackeray: राज ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, वर्धा शहरात झळकले मनसेचे बॅनर्स

MNS Raj Thackeray Latest News: मनसे कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी लावलेल्या बॅनर्सवर राज्य ठाकरे "भावी मुख्यमंत्री" असा मजकूर छापण्यात आला आहे. वर्धा शहरातील विश्रामगृह परिसर हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
Published on

चेतन व्यास, साम टीव्ही वर्धा

Maharashtra Political News Updates: लोकसभेत महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभेसाठी वेगळीच चूल मांडली आहे. त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली असून काही उमेदवारही जाहीर केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून मिशन महाराष्ट्राच्या माध्यमातून मनसैनिकांसोबत संवाद साधत आहेत.

MNS Raj Thackeray Latest News
Maharashtra Politics : वरळी विधानसभेत यंदा तिहेरी लढत होणार? आदित्य ठाकरेंविरोधात महायुतीचा उमेदवार कोण, पाहा VIDEO

आज राज ठाकरे वर्धा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा (Vidhan Sabha Election) आढावा घेणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर राज्य ठाकरे "भावी मुख्यमंत्री" असा मजकूर छापण्यात आला आहे. शहरातील विश्रामगृह परिसर हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

या बॅनर्सची संपूर्ण वर्धा शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, आज राज ठाकरे वर्धा येथील चारही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. यावेळी काही कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मनसेत प्रवेश देखील करणार असल्याची माहिती आहे.

दुपारी 4 वाजता राज ठाकरे (MNS Raj Thackeray) वर्धा येथे दाखल होणार असून जवळपास 2 तास ते कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. विदर्भात एकूण विधानसभेच्या 62 जागा आहेत. यातील बहुतांश जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. विदर्भ हा काँग्रेसचा गड मानला जातो.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसने आपली ताकद दाखवली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही विदर्भात सर्वाधिक जागा जिंकण्याचे काँग्रेसचे ध्येय आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी देखील आपला मोर्चा विदर्भाकडे वळवला आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने विदर्भात भाजपला साथ दिली होती.

मात्र विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी सध्यातरी एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात आतापर्यंत अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यांनी बहुतांश उमेदवारांचा डेटाही गोळा केला आहे. मनसेकडे निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे असं मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगितलं जातंय.

MNS Raj Thackeray Latest News
Samarjeet ghatge : कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का; समरजित घाटगे यांच्या शरद पवार गटाच्या पक्ष प्रवेशाची तारीख ठरली, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com