Maharashtra Politics : ठाकरेंची युती, मविआला खिंडार? ठाकरेंची दुखरी नस, पवारांनी दाबली, ठाकरेंच्या युतीवर पवारांचं भाष्य

Maharashtra Political News : ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरुन शरद पवारांनी राज ठाकरेंना चिमटा काढलाय.. नेमकं शरद पवार काय म्हणालेत? आणि ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मविआला खिंडार पडणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचे संकेत दिले... त्यामुळे युतीच्या चर्चांना उधाण आलंय...दरम्यान शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये युतीच्या चर्चांवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंचं कौतूक करत राज ठाकरेंच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेऊन खोचक टोला लगावलाय.... मात्र शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय? पाहूयात...

शरद पवार काय म्हणाले?

- राज यांच्या सभांना गर्दी, मात्र त्याचं मतात रुपांतर नाही, हा आजपर्यंतचा अनुभव

- उद्धव ठाकरेंना सभेच्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर करण्यात यश

- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते दिसून आलं

- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआ म्हणून एकत्र लढल्या पाहिजे

- महायुतीत जागा वाटप व्यवस्थित होईल, असं वाटत नाही. त्याचा फायदा मविआला मिळण्याची शक्यता

Maharashtra Politics
लक्षात ठेवा, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय; नितेश राणेंचा रोख कुणाकडे?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत मनसे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारीही सकारात्मक असल्याचं चित्र आहे.. मात्र त्यापार्श्वभुमीवर शरद पवारांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावल्यानं मनसेनंही पवारांना उत्तर दिलंय...

Maharashtra Politics
Pune Rain : पुण्यात पावसाचा हाहाकार! हिंजवडी IT पार्कमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरुप; पाण्यात अनेक दुचाकी बुडाल्या

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यास महाविकास आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.. मात्र त्याचं कारण काय? पाहूयात...

ठाकरेंची युती, मविआला खिंडार?

- प्रादेशिक पक्ष असल्यानं मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा ठरणार

- मनसेच्या कट्टर मराठी आणि हिंदुत्ववादी भुमिकेमुळे मविआत मतभेदाची शक्यता

- मनसेमुळे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची मुस्लीम मतं दुरावण्याची भीती

- काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत समन्वय साधण्यात अडचणीची शक्यता

Maharashtra Politics
Nanded Crime : आजीबाई घरात एकट्याच, ७५ वर्षीय महिलेला संपवलं, दुर्गंधी आल्यानं घटना उघडकीस; नांदेड हादरलं

विधानसभा निवडणुकीनंतर मविआत वादाची ठिणगी पडली.. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वबळावर लढण्याची मागणी जोर धरत आहे. त्यात आता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महाविकास आघाडीत मीठाचा खडा पडणार की किमान समान कार्यक्रमावर मविआत चौथा भिडू सहभागी होणार? याकडे लक्ष लागलंय.

Maharashtra Politics
उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; नाराजी उफाळली, ३०-४० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com