सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायत; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर घणाघात

Raj Thackeray Statement On Gyanesh Kumar And Election Commission: राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. SIR प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करावी आणि पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
RAJ THACKERAY SLAMS ELECTION COMMISSION
RAJ THACKERAY SLAMS ELECTION COMMISSIONsaam tv
Published On: 

वैदेही काणेकर, साम टीव्ही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. ज्ञानेश कुमार हे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे वदवून घेण्यासाठी वापरले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवत आहेत, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली. गेल्या दोन दोन दिवसांपासून ज्ञानेश कुमार गप्प असल्याचे सांगत, त्यांना बोलते करणारेही कुठे दिसत नाही असा टोला राज ठाकरे यांनी लगावला, ज्ञानेश कुमार यांच्यासारख्यांना हाताशी धरून सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

RAJ THACKERAY SLAMS ELECTION COMMISSION
SIRवरून निवडणूक आयुक्त भिडले, निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर

SIR हे सत्ताधाऱ्यांचे नवे अस्त्र

२०२५ पासून SIR म्हणजेच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया हे सत्ताधाऱ्यांचे नवे अस्त्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. SIR प्रक्रियेत कथित घोळ झाल्याचा दावा करत, या प्रक्रियेबाबत निवडणूक आयुक्तच बोलत असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रात २०२६ मध्ये SIR प्रक्रियेसंदर्भात निवडणूक विभागाकडून अधिकृत माहिती आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज ठाकरे सोशल मीडियावर की, झालेली SIR प्रक्रिया संपूर्णपणे रद्द करण्यात यावी. या प्रक्रियेत नेमके काय घोळ झाले, याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि त्यानंतर नव्याने SIR प्रक्रिया राबवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली

RAJ THACKERAY SLAMS ELECTION COMMISSION
ज्ञानेश कुमार गृहमंत्र्यांचे शार्प शूटर आणि छोटा शकील, राऊतांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

EVM ऐवजी बॅलेट पेपरची मागणी

यापुढील सर्व निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे. यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभे करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज ठाकरे यांनी यापूर्वीही EVM ऐवजी पेपर बॅलेटची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com