MNS: भाजप, काँग्रेसनंतर आता राज ठाकरेंचं 'मिशन विदर्भ'; ११ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या घेणार बैठका

Vidarbha Assembly Election: मनसे प्रमुख राज ठाकरे विधानसभेच्या तयारीला लागलेत. विधानसभा निवडणुकीसाठी ते मोर्चेबांधणी करण्यासह उमेदवारांची चाचपणी करत आहेत. राज ठाकरे यांनी विदर्भावर आपलं लक्ष केंद्रीत केलंय.
MNS: भाजप, काँग्रेसनंतर आता राज  ठाकरेंचं 'मिशन विदर्भ'; ११ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या घेणार बैठका
Assembly Election
Published On

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

राज्यातील सत्तेसाठी विदर्भ महत्त्वाचं क्षेत्र आहे. यामुळे राजकीय पक्षांनी आपला मोर्चा विदर्भाकडे वळवलाय. भाजप आणि काँग्रेसननंतर आता मनसेनेही आपलं सर्व लक्ष विदर्भाकडे केंद्रित केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे मिशन विदर्भ ठरवलं असून ते पुन्हा एकदा दोन दिवसाचा विदर्भ दौरा करणार आहेत. विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी कंबर कसली असून ते पक्षाची मोर्चेबांधणी करत आहेत. त्यासाठी दुसऱ्यांदा विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत.

राज्यातील राजकारणात विदर्भाला विशेष महत्त्व प्राप्त झालायं. सत्तेचं गणित बसवण्यासाठी राजकीय पक्षांनी आपलं लक्ष विदर्भाकडे केंद्रित केलंय. दोन दिवसापूर्वीच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभेसाठी मायक्रो प्लॉनिग सुरू केलंय. यात त्यांनी कार्यकर्त्यांना विदर्भावर अधिक लक्ष देण्यास सांगितलंय.

MNS: भाजप, काँग्रेसनंतर आता राज  ठाकरेंचं 'मिशन विदर्भ'; ११ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या घेणार बैठका
Raj Thackarey Video: मराठा आरक्षणाची गोष्ट होणारच नाही; आंदोलकांच्या चर्चेत राज ठाकरेंचं मोठं विधान

अमित शहा यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. राज्यातील सत्तेचा मार्ग विदर्भातून जाणार असल्याचं सांगत. भाजप पदाधिकाऱ्यांना 'इलेक्शन मोड'वर आणण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनीपदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. विदर्भात आपण अमित शाह यांनी ४५ जागा जिंकू असा दावा अमित शहा यांनी केलाय. तर महाविकास आघाडीच विदर्भात ४५ जागा जिंकेल असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

MNS: भाजप, काँग्रेसनंतर आता राज  ठाकरेंचं 'मिशन विदर्भ'; ११ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या घेणार बैठका
Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

भाजप आणि काँग्रेसनंतर आता मनसेनेही विदर्भावर लक्ष केंद्रीत केलंय. त्याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे हे दुसऱ्यांदा विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे विदर्भातील मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. विदर्भातील ११ जिल्ह्यांतील पक्ष पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. राज ठाकरे २७ सप्टेंबरला पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा यवतमाळ, तर २८ ला पूर्वविदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी हॅाटेल ग्रॅण्ड महफिलमध्ये बैठक घेणार आहेत.

उमेदवारांची घोषणा करणार

मागील विदर्भ दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी यवतमाळ, जिल्ह्यातील वणी, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जागेची घोषणा केली होती. त्यामुळे विदर्भातील 62 जागांपैकी किती विधानसभांवर उमेदवार राज ठाकरे घोषित करणार का याकडे लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com