Raigad Rope Way Service: पर्यटकांसाठी खूशखबर! रायगडावर 'रोप वे' सेवा आजपासून पुन्हा सुरू; तिकीट आणि बरंच काही, जाणून घ्या एका क्लिकवर

Raigad Rope Way Service Start Again From Today: रायगड किल्ल्यावरील रोप वे संदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. आजपासून पुन्हा रोप वे पर्यटकांसाठी सुरू होतोय.
रायगड किल्ल्यावरील रोप वे
Raigad Rope WaySaam TV

सचिन कदम, साम टीव्ही रायगड

रायगडमधून पर्यटकांसाठी मोठी बातमी समोर आलीय. किल्ले रायगडावरील 'रोप वे'सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. ही रायगडावर जाणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. रविवारी संध्याकाळी ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग आणि रोप वे बंद ठेवण्यात आले होते.

'रोप'वेची सुविधा

जिल्हाधिकारी रायगड आणि पुरातत्व विभागाने रोप वे बंद ठेवण्याची सुचना केली (Raigad Rope Way Service) होती. पावसाची परिस्थिती सामान्य झाल्यामुळे आजपासून 'रोप वे'ची सेवा पुन्हा सरू करण्यात आली आहे. रायगड किल्ला चढण्यासाठी १४५० पायऱ्या चढून जावं लागतं. यासाठी साधारण दोन तास सहजपणे लागतात. त्यामुळे अनेकजण 'रोप वे'ने जाण्याचा पर्याय निवडतात.

'रोप वे'चं तिकीट काय?

रायगड किल्ल्यावर 'रोप वे'ने जाण्यासाठी पायथ्यालाच तिकीट काढावं लागतं. किल्ल्याच्या पायथ्याशी गेल्यावर रोप वेचं तिकीट काढता येतं. तिकीट बुकिंग करण्यासाठी रोपवे व्यवस्थापनाने raigadropeway.com संकेतस्थळ (Raigad Fort) दिलंय. बऱ्याचदा पर्यटक या संकेतस्थळावर बुकिंग करून तिकीट काढतात. रायगडावर रोप वेचं रिटर्न तिकीट २९० रूपये ते ३१० रूपयाच्या दरम्यान आहे. रायगडावर रोप वे सकाळी पाच वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पर्यटकांसाठी सुरू असतो.

रायगड किल्ल्यावरील रोप वे
Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

रायगडावर कसं जायचं?

किल्ले रायगड मुंबईपासून सुमारे २०० किमी, (Raigad Rope Way Price) पुण्यापासून १४०, कोल्हापूरपासून ३०० तर नाशिकपासून २७० किमी अंतरावर आहे. रायगड महाडपासून ५० किमी अंतरावर आहे. किल्ल्याच्या पायथ्याला नाश्ता अन् जेवणाची दुकाने आहेत. किल्ल्यावर पाणी आणि खाण्याच्या वस्तू देखील आता उपलब्ध आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या वापरल्यास दोन तासांचा कालावधी लागू (Raigad Rope Way) शकतो. जवळपास दोन हजार पर्यटक एका दिवसात रोप वेने रायगडावर प्रवास करतात.

रायगड किल्ल्यावरील रोप वे
Weight Loss With Jumping Rope : झटपट वजन कमी करण्यासाठी हा खेळ एकदम बेस्ट! मिनिटात होईल 15 ते 20 कॅलरीज बर्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com