Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?

Raigad Fort: रायगड किल्ल्यावर गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाने आत्महत्या करत असल्याचे फोन कुटुंबीयांना केला होता. त्यानंतर ८०० फूट खोल दरीत त्याचा मृतदेह आढळला.
Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?
Raigad FortSaam Tv
Published On: 
  • रायगड किल्ल्यावर ८०० फूट दरीत तरुणाचा मृतदेह आढळला

  • ठाण्याच्या तरुणाचा रायगड किल्ल्यावर मृत्यू

  • टकमक टोकावरून उडी मारत तरुणाची आत्महत्या

  • ड्रोनच्या मदतीने तरुणाचा मृतदेह शोधून काढला

सचिन जाधव, रायगड

किल्ले रायगडावरून दरीत उडी मारून ठाण्याच्या तरुणाने आत्महत्या केली. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी कुटुंबीयांना फोन केला होता. त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. अखेर रायगड किल्ल्याजवळ ८०० फूट खोल दरीत त्याचा मृतदेह आढळून आला. या तरुणाने आत्महत्या का केली यामागचे कारण समोर आले नाही. त्याचा मतदेह दरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले रायगडच्या टकमक टोकावरून दरीत उडी मारून आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले. टकमक टोकाखाली निजामपुर बाजूला ८०० फूट खोरीत त्याचा मृतदेह आढळून आला. रात्री आंधार आणि दरीच्या धोकादायक स्थितीमुळे बंद केलेले शोध कार्य सकाळी सुरु केले होते.

Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?
Baramati Crime: बारामती हादरली! मध्यरात्री २ महिलांसोबत भयंकर घडलं, घरातील दृश्य पाहून सर्वजण घाबरले

ड्रोनच्या मदतीने शोध घेतला असता ८०० फूट खोल दरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. प्रचंड झाडी, खोलदरी आणि उतारामुळे मृतदेह बाहेर काढण्याचे शोध पथकासमोर मोठे आव्हान होते. बचाव पथक, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह शोधून काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?
Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

सुयोग पांचाळ (३७ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. तो ठाण्यात कुटुंबीयांसोबत राहत होता. सुयोग शनिवारी किल्ले रायगडावर आला होता. आत्महत्या करीत असल्याचा त्याने घरी फोन करून सांगितले आणि त्याचा फोन बंद केला होता. त्याचा भाऊ सुवेल पांचाळ याने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उभी केलेल्या मोटर सायकलची पहाणी करीत घडल्या प्रकाराबाबत महाड तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला.

Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?
Mumbai Crime: बांधकाम व्यावसायिकाला धमकी, खंडणी घेताना तिघांना रंगेहात पकडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com