रायगडावर प्री-वेडिंगचा उच्छाद; शिवरायांच्या पवित्र स्थळाचा अपमान

Pre Wedding Shoot At Raigad Fort Controversy Maharashtra: शिवप्रेमींचं प्रेरणास्थान असलेलं रायगड प्री-वेडिंगचं स्पॉट बनत चाललंय. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रायगडाला प्रशासकीय अनास्थेचा फटका कसा बसलाय. रायगडावर नेमकं काय सुरु आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Pre-wedding shoot at Raigad Fort triggers outrage over misuse of a historic and sacred site linked to Chhatrapati Shivaji Maharaj.
Pre-wedding shoot at Raigad Fort triggers outrage over misuse of a historic and sacred site linked to Chhatrapati Shivaji Maharaj.Saam Tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

हा व्हिडीओ नीट पाहा... हे कुठलं वेडिंग डेस्टिनेशन नाही... तर ही आहे महाराष्ट्राची अस्मिता.... स्वराज्याची राजधानी आणि शिवप्रेमींचं प्रेरणास्थान... किल्ले रायगड.... याच रायगड किल्ल्यावर जिथं देश विदेशातील शिवप्रेमी नतमस्तक होतात... त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरची जागा चक्कं प्री वेडिंगचा स्पॉट बनलीय...

होय....शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रायगडाला प्री वेडिंगचाच स्पॉटच बनवलाय... त्याला अप्रत्यक्ष मदत होतेय ती प्रशासनाच्या अनास्थेची....कारण स्वराज्याची राजधानी रायगडवरची सीसीटीव्ही यंत्रणाच बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...हेच सीसीटीव्ही बंद असल्यानेच प्री वेडिंग शुट करणाऱ्या जोडप्यांनी गडावर उच्छाद मांडलाय.... आता हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांनाही जाग आलीय.... रायगडचे मंत्री भरत गोगावलेंनी गडाचं पावित्र्यं भंग करणाऱ्यांना शिवप्रेमी धडा शिकवतील, असं म्हटलंय... तर सुनील तटकरेंनी या प्री वेडिंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केलीय..

खरं तर शिवरायांच्या रायगडाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झालाय.. त्यामुळे रायगडच्या संवर्धनासाठी 606 कोटींचा निधी सरकारनं मंजूर केलाय... त्यातील 147 कोटींची कामंही झाल्याचा दावा करण्यात येतोय.. तर आणखी 345 कोटींच्या कामांना मंजूरी देण्यात आलीय... मात्र कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्यानंतरही रायगडची सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्यानं सुरक्षेचाही पुरता बोजवारा उडल्याचं चित्र आहे....

त्यामुळे रायगडावर जाऊन प्री वेडिंग करणाऱ्यांना सीसीटीव्ही बंद करुन रान मोकळं करुन देण्यात अधिकाऱ्यांचंही साटंलोटं आहे का? असाही सवाल निर्माण होतोय... एवढंच नाही तर रायगडसारख्या पवित्र ठिकाणी प्री वेडिंग करुन गडाचं पावित्र्यं धोक्यात आणणाऱ्यांवरही कारवाई व्हायलाच हवी.... तरच रायगडाचं पावित्र्यं कायम राहील....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com